हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे करा अन् माझ्यासमोर लढा; भुजबळांचं जरांगेंना आव्हान

रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal Challenges Manoj Jarange : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या (Maharashtra Elections)आहेत तशा आव्हान प्रतिआव्हानाच्या भाषा कानावर पडू लागल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि छगन भुजबळ यांच्यात बऱ्याच दिवसांपासून शाब्दिक वाद रंगलं आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांनी खुलं आव्हान दिलं आहे. रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा हे आमचं आव्हान आहे. प्रत्येक वेळी बदलता. आज उपोषणाला बसता उद्या परत उठतात अशा शब्दांत छगन भुजबळांनी आव्हान दिलं.

छगन भुजबळ संतापले अन् ग्रामपंचायत भंग करण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, ‘हे’ आहे कारण

छगन भुजबळ टीव्ही 9 वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भुजबळांनी जरांगेंवर जोरदार टीका केली. भुजबळ म्हणाले, मनोज जरांगेंनी आता स्वतः माझ्यासमोर उभं राहावं. ही माझी इच्छा आहे. निवडणुकीत त्यांनी मला पाडलं तरी माझा आवाज बंद होणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच संरक्षण करणं हेच माझं काम आहे. त्यासाठी मी नेहमीच तयार आहे.

सरकारमध्ये असलो काय किंवा रस्त्यावर असलो काय काही फरक पडत नाही. मला 57-58 वर्षांपासून सवय आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये काम करण्याची. त्यामुळे मला फरक पडत नाही. येवला मतदारसंघात माझ्याविरुद्ध कुणीही लढावं त्यासाठी मी तयार आहे. इतकंच नाही तर या मतदारसंघात मी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

मराठा समाजासाठी तुम्ही ऐक थेंबही रक्त सांडल नाही; आमदार राजेंद्र राऊतांचे जरांगेंवर टीकास्त्र

Exit mobile version