छगन भुजबळ संतापले अन् ग्रामपंचायत भंग करण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, ‘हे’ आहे कारण

छगन भुजबळ संतापले अन् ग्रामपंचायत भंग करण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, ‘हे’ आहे कारण

Chhagan Bhujbal: राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अंगणवाडी इमारतीचा आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण सोहळ्यात न बोलावल्याने ग्रामपंचायत नांदूर माध्यमेश्वर तसेच सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य , नाशिक व जिल्हा परिषद प्रशासन, नाशिक यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दिली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 273 नुसार ग्रामपंचायत नांदूर माध्यमेश्वर तसेच सरपंच, उपसरपंच,  माजी जिल्हा परिषद सदस्य नाशिक व जिल्हा परिषद प्रशासन, नाशिक यांच्या विरोधात ही तक्रार केली आहे. 29 जुलै 2024 रोजी ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर ता. निफाड येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा पार पडला होता मात्र या कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही सूचना मंत्री छगन भुजबळ यांना दिल्या नसल्याने भुजबळांनी विशेषाधिकार भंगाची तक्रार पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

पत्रात काय म्हणाले

छगन भुजबळ मी महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच सौ. हिराबाई दामोदर खुरासणे, ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर व जबाबदार जिल्हा परिषद प्रशासन तसेच माजी जि.प.सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार, श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे यांचे विरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना देत आहे. दि. 29 जुलै 2024 रोजी ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर ता. निफाड येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नांदूरमध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक, (बांधकाम खर्च रु.60 लक्ष) या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. तसेच याच दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार यांच्या हस्ते एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. मी या क्षेत्राचा विधानसभा सदस्य असून या कार्यक्रमासाठी मला जिल्हा परिषद, नाशिक प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही सूचना दिलेली नाही वा मला आमंत्रित केलेले नाही.

या बाबतीत मी जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) श्री. प्रताप पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड श्री. महेश पाटील यांना सूचना देऊन विचारणा केली. परंतु वरील पैकी कोणीही सदर प्रकरणी हस्तक्षेप करून चूक सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. तसेच श्रीमती अमृता पवार या माजी जिल्हा परिषद सदस्य असून कोनशिलेवर त्यांचा उल्लेख जिल्हा परिषद, सदस्य, नाशिक असा करण्यात आला आहे. हि बाब देखील नियमांस अनुसरून नाही.

Andhra Pradesh Rain: पावसाचा हाहाकार, आंध्र प्रदेशात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू

या संदर्भात मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे. सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच सौ. हिराबाई दामोदर खुरासणे, ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर, माजी जि.प. सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार, श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) श्री. प्रताप पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड श्री. महेश पाटील यांनी शासकीय निधीतून बांधकाम केलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारतींच्या लोकार्पण व उदघाटन सोहळ्यास स्थानिक विधानसभा सदस्यास डावलून विधानमंडळ सदस्यांचा पर्यायाने विधानसभेसारख्या सार्वभौम व सर्वोच्च संस्थेचा जाणीवपूर्वक अवमान व विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी विशेषाधिकार भंग समितीकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी आपणांस विनंती आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube