Download App

मोठी बातमी! छगन भुजबळांनी रात्री घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास खलबत

दर मंगळवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक होते, या बैठकीबाबत देखील भुजबळांना विचारण्यात आलं. यावर बोलताना जीथे माझी गरज नाही तीथे

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal Meets CM Fadnavis : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे. (Bhujbal) छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे आता भुजबळ लवकरच भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंडेंवर आरोप असताना राजीनामा;मीच पहिलं बोललो, भुजबळांचं दमानियांना प्रत्युत्तर

नेमकं काय म्हणाले भुजबळ?

आज मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याच खरं कारण म्हणजे त्यांच्याकडे गृहमंत्रालयही आहे. आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राऊंडला भिंत टाकायची आहे, येवला पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत. आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे. आमच्या इतर काही फायली देखील आहेत, उदाहरणार्थ आमच्या लासगाव कमिटीचं थोडं काम आहे. एस गाववरून आम्हाला येवल्याला पाणी आणायचं आहे त्याची फाईल आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पडून आहे. त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. बाकी राजकारणावर चर्चा करण्याचं काही कारण नाही, राजकारणावर काय चर्चा करणार? असं भुजबळ यांनी माध्यामांशी बोलताना म्हणाले.

मी नाराज आहे

दर मंगळवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक होते, या बैठकीबाबत देखील भुजबळांना विचारण्यात आलं. यावर बोलताना जीथे माझी गरज नाही तीथे मी जात नाही, असं म्हणत त्यांनी बोलण टाळलं. तसंच, तुम्ही अजूनही नाराज आहात का? असा सवालही त्यांना यावेळी करण्यात याला, त्यावर बोलताना ते म्हणाले मी नाराज आहे की नाही, किती नाराज आहे. हे कसं सांगता येईल. त्याचं थर्मा मीटर मला अजून तरी मिळालेलं नाहीये, अशी मिष्कील टिपणी देखील यावेळी भुजबळ यांनी केली. मात्र, राजकीय वर्तुळात या भेटीची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

follow us