Download App

अखेर एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन मंजूर; 2021 पासून होते अटकेत

Eknath Khadase Son in Law Get Bail From Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीने जुलै 2021 मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्ये होते. यानंतर आता त्यांना जामीन मिळाला आहे.

Manipur Violence : ‘समान नागरी कायद्याच्या गप्पा मारताय, आधी मणिपूरकडे बघा’; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गिरीष चौधरी हे साधारण दीड वर्षापासून जेलमध्ये होते, ईडीच्या कारवाईत त्यांना ही जेल झाली होती. पुण्यातील भोसरीमध्ये ३.१ एकर जमीन खरेदीत, एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात होतं. २०१६ मधील हे प्रकरण आहे, ३१ कोटी रुपयांचा ३.१ एकर जमीनाचा हा भूखंड एकनाथ खडसे यांचे जावई आणि पत्नी यांनी ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

एकनाथ खडसे यांचं भोसरी भूखंड प्रकरणात महसूल मंत्री पद गेलं,याच दरम्यान भाजप ज्या पक्षात एकनाथ खडसे याच्या दाव्यानुसार त्यांनी ३० ते ३५ वर्ष काढली, पक्षाची सेवा केली, त्यांच्यात आणि पक्षातील नेत्यांमध्ये या प्रकरणावरुनही आरोप प्रत्यारोप झाले, एकंदरीत एकनाथ खडसे यांचा भाजपातला प्रवास रोखण्यात हे भोसरी भूखंड प्रकरण कारणीभूत ठरलं. तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील चौकशी झाली, गिरीष चौधरी जे त्यांचे जावई आहेत त्यांना दीड वर्ष जेल झाली.

 

 

 

Tags

follow us