अजितदादांनी 500 कोटींचा निधी दिला? जयंत पाटील म्हणाले खरं की काय मला माहीतच नाही

Jayant Patil at Assembly :  पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या  माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला […]

Letsupp Image   2023 07 25T183906.248

Letsupp Image 2023 07 25T183906.248

Jayant Patil at Assembly :  पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या  माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटी रुपये निधी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशाप्रकारे निधी मागण्यासाठी मी कुणाला पत्रही लिहिले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी सभागृहात दिले. दरम्यान माझ्या मतदारसंघाला नियमानुसार जवळपास २० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र काही वृत्तपत्र या संदर्भातील चुकीच्या माहिती दिल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे मत त्यांनी सभागृहात मांडले.

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, मला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे वृत्त प्रसारित होत आहे मात्र यात काहीही तथ्य नाही. पुरवणी मागण्यांमध्ये मला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला हा गैरसमज आहे. हे आकडे खरे नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.

रोहित पवारांविरोधात राम शिंदे समर्थक आक्रमक ! थेट पोलिसांकडे तक्रार

दरम्यान, अर्थमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी दिल्याची माहिती आहे. यामध्ये जे आमदार शरद पवारांच्या गोटात आहे, त्यांना देखील अजित पवारांनी निधी दिल्याचे समजते आहे. तसेच शिंदे गटातील काही आमदारांना कोट्यवधीचा निधी अजितदादांनी दिल्या असल्याची चर्चा आहे. पण यावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येते आहे. काँग्रेस आमदारांना निधी मिळाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते आहे.

Exit mobile version