श्री सदस्यांचे मृत्यू सरकारने घडवून आणलेत; आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप

Jitendra Awhad On Shinde Goverment :  काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या सोहळ्यानंतर जवळपास 20 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षाकडू सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 19T175823.871

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 19T175823.871

Jitendra Awhad On Shinde Goverment :  काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. या सोहळ्यानंतर जवळपास 20 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षाकडू सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवरी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरले आहे. या अगोदर त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये काही जण गर्दीमध्ये चेंगरताना दिसत आहेत. यावरुन आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरले आहे. जे व्हिडिओ आले त्यात चेंगरा चेंगरी दिसत आहे. तेथील लोक हे जिवंत आहे का? मृत्यू हे मी सांगू शकत नाही. तो त्या परिसरामधील  व्हिडिओ आहे, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

Cabinet Meeting : बैठकीतील महत्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

आप्पासाहेब यांचा वापर हे लोक राजकारणासाठी करत आहे. हे त्या लोकांना देखील माहिती नाही. आप्पासाहेब यांना देखील याची माहिती नाही. आप्पासाहेबांना  पुरस्कार देण्याचा कार्यक्रम राजभवनमध्ये घेतला असता तर हा अनर्थ टळला असता, असे आव्हाड म्हणाले आहेत.

या सर्वाला सरकार जबाबदार आहेत असे तज्ज्ञ बोलत असल्याचे आव्हाडांनी सांगितले आहे .  सरकारने स्वत:हून हे मृत्यू घडवून आणले आहेत. आप्पासाहेब यांचे नाव पुढे करून त्यामागे मागे लपू नका, हे चुकीचे आहे. तुम्ही मृतांच्या नातेवाईकांना फक्त 5 लाखांची रक्कम जाहीर केली आहे. तुमच्यामुळे त्यांच्या जीव गेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना 1 कोटी रुपये व सरकारी नोकरी दिली पाहिजे, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

Cabinet Meeting : बैठकीतील महत्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

तुम्हाला श्री सदस्यांची मते पाहिजे होती. त्यामुळे तुम्ही एवढी गर्दी जमा केली. आदल्यादिवशीपासून तिथे लोक आले होते. तिथे त्यांच्यासाठी कोणतीही सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिली नव्हती. आपल्या सहकाऱ्यांचा झालेला मृत्यू सर्व श्री सदस्य लक्षात ठेवतील, असे म्हणत  आव्हाडांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version