उगाच कोंबडी झुंजवण्याची कामं करू नका; आव्हाड पत्रकारावर भडकले

Jitendra Awhad :  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जितेंद्र आव्हाड हे एका पत्रकारावर भडकले आहेत. तुम्ही कोंबड्या झुंजवण्याचे काम बंद करा, असे म्हणत आव्हाडांनी त्या पत्रकाराला सुनावले आहे. माहिती घेऊन बोलत जा, असेही त्यांनी या पत्रकाराला सांगितले आहे.  जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे व आपली बाजू त्यांनी ट्विटरवर मांडली आहे. आज मातोश्रीवर भेटायचं […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T151853.490

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 10T151853.490

Jitendra Awhad :  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जितेंद्र आव्हाड हे एका पत्रकारावर भडकले आहेत. तुम्ही कोंबड्या झुंजवण्याचे काम बंद करा, असे म्हणत आव्हाडांनी त्या पत्रकाराला सुनावले आहे. माहिती घेऊन बोलत जा, असेही त्यांनी या पत्रकाराला सांगितले आहे.  जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे व आपली बाजू त्यांनी ट्विटरवर मांडली आहे.

आज मातोश्रीवर भेटायचं असं काही दिवसांपूर्वीच ठरलं होतं. पण, मी अचानक बाहेर गेल्यामुळे आनंद परांजपे एकटे मातोश्रीवर गेले. त्यांनी जर व्हॉट्सअपवर फोटो टाकले नसते तर कदाचित कोणालाच कळलं नसतं. यामध्ये लपविण्यासारखं काहीच नाहीत म्हणून त्यांनी व्हॉट्सअपवर फोटो टाकले. चर्चा ही होती की, मोर्चा यशस्वी झाला आता आपण काय करायला पाहिजे याबाबत पुढील रणनिती ठराविण्यासाठी आनंद परांजपे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटले, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुमचा उमेदवार जिंकल्यास ईव्हीएम बरोबर अन्… बावनकुळेंचा विरोधकांना चिमटा

पुढे त्यांनी त्या पत्रकाराचे नाव घेत म्हटले की, उगाच कोंबडी झुंझविण्याची कामं करू नका. आधी माहिती घ्या. तुम्ही मला फोन केला असतात तर मी तुम्हांला सगळं खरं सांगितलं असतं, असे आव्हाड म्हणाले आहेत. याआधी त्या पत्रकाराने एक ट्विट केले होते.  आनंद परांजपे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली… पुढे काय? याविषयीच्या चर्चांना उधाण येणार, असे त्या पत्रकाराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. यावरुन आव्हाड संतापले आहेत.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

 

Exit mobile version