Download App

राष्ट्रवादी अध्यक्षपदाबाबत प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान; म्हणाले, मी अध्यक्षपदासाठी…

  • Written By: Last Updated:

Prafull Patel On NCP Chief Post :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण अध्यक्ष होणार त्यासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची कालपासून चर्चा आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही. सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच छगन भुजबळांचे वैयक्तिक मत आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षा होणार हे सर्व माध्यमात सुरु असलेले अंदाज आहेत, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

अध्यक्षाची निवड ते जयंत पाटलांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नेते, उद्योजक यांचे त्यांना फोन आल्याची माहिती आहे. पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास, त्यांच्याकडून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवल्याची माहिती आहे. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. यावरही प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीत राजीनामा नाट्य तर भाजपकडून ऑफर, बावनकुळे म्हणाले…

तसेच शरद पवार अंतिम निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत नवीन अध्यक्ष बसवण्याचा प्रश्नच येत नाही. मी अध्यक्षपद घेण्यासाठी अजुनही तयार नाही. पक्षाने अनेक मोठमोठ्या जबाबदाऱ्या मला दिल्या आहेत, मी अध्यक्ष पदासाठी इच्छुक नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक नावांची चर्चा केली जात आहे.

 

Tags

follow us