अध्यक्षाची निवड ते जयंत पाटलांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

अध्यक्षाची निवड ते जयंत पाटलांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर

Sharad Pawar retirement : शरद पवारसाहेबांनी आम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिला आहेत. त्या आम्ही पार पाडल्या आहेत. पण पवारसाहेबांच्या राजीनाम्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन व्यक्ती कोण निवडायचा यावर विचार झालेला नाही. मी अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याला तयार नाही. सध्या मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्याक्ष आहे.अगोदरच माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. पवारसाहेबांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्यानंतरच आम्ही पुढचा विचार करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार असल्याची कालपासून चर्चा आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही बैठक झालेली नाही. सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच छगन भुजबळांचे वैयक्तिक मत आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षा होणार हे सर्व माध्यमात सुरु असलेले अंदाज आहेत, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे. सिल्वर ओकवर आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होईल, असेही त्यांनी सांगितले.

पवारांनी मौन सोडलं; अध्यक्षपदाबाबत 5 मे रोजी समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल

आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक नव्हती. बैठकीसाठी कोणतेही नेते आले नव्हते. शरद पवारसाहेब नेहमीप्रमाणे आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आले होते. कोणताही निर्णय झाला नाही. पवारसाहेबांनी दोन-तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. अजून एक-दोन दिवस वाट पाहू. त्यानंतर बैठकीबद्दल मी अधिकृत स्वतः सांगणार आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं…

पक्षामध्ये सर्व लोक एकत्र आहेत. पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र आहोत. पक्षामध्ये काहीही गडबड होणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी धीर ठेवावा, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असून पक्षामध्ये कोणतीही फूट नाही. कारखान्याच्या बैठकीसाठी जयंत पाटील पुण्यात गेले होते. संध्याकाळच्या बैठकीला ते हजर राहणार आहेत. जयंत पाटील नाराज नसल्याचे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले आहे. पवारसाहेबांनी राजीनामा देऊ नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहेत. आता कोणत्याही कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नये, असे अवाहनही त्यांनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube