राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं…

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं…

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही बैठक आज बोलावण्यात आलेली नसल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर या बैठकीबाबत छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय.

IPL 2023, GT vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत दिल्ली कायम, करो या मरोच्या सामन्यात गुजरातला नमवलं

छगन भुजबळ म्हणाले, राज्यात नुकत्याच बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. बाजार समिती निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांसह देशभरातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. भेटीत कार्यकर्त्यांशी पवार चर्चा करीत असल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

शरद पवारांनी सांगितल्यानूसार राजीनाम्याच्या निर्णयावर ते एक ते दोन दिवस विचार करीत आहेत. पुढील एक दोन दिवसांत शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुढची रणनीती काय असणार? हे स्पष्ट होणार आहे. पक्षाचे नेते जयंत पाटील आज मुंबईत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. ते आल्यानंतरच निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Mahesh Tapase : शरद पवारांचा राजीनामा कमिटीने मंजुर केला तर आम्ही आमचा राजीनामा देऊ

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या भूमिकेवर विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनी बोलून दाखवलंय. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

पवार यांचा राजीनामा कमिटीने मंजूर केला तर आम्ही देखील आमचा राजीनामा देऊ, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक लोक म्हणत आहेत या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपल्या प्रदेशाध्य पदाचा राजीनामा देणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube