राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. अगदी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत शरद पवार हे अनेकदा व्यासपीठावर एकत्र दिसतात. शरद पवार हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.
शरद पवार हे आज सकाळी नागपूर येथे आले. नागपूरच्या विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली व ते नितीन गडकरी यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये काही विषयांवर चर्चा देखील झाली. यावेळी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेच्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेला भेट देण्यासाठी नागपूरमध्ये आले होते.
मोदींनीच चोरांची यादी जाहीर केलीय ना ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
अनिल देशमुख हे अनेक महिने मनी लाँड्रींग केसमुळे जेलमध्ये होते. त्यामुळे या भेटीला मोठे महत्व आले आहे. यावेळी शरद पवार व नितीन गडकरी यांच्या भेटीमध्ये राजकीय व शेतीसंबंधित विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसचे शरद पवार हे गडरींच्या घरी जेवण देखील करणार याची माहिती आहे.
गडकरींचं विधान अन् फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येणार’ च्या चर्चांना बळ
दरम्यान, कालच शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत व आमदार भरत गोगावले यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत प्राध्यापक प्रवीण ढवळ हे देखील उपस्थित होते. हे भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली हे अद्याप कळू शकलेले नाही.