गडकरींचं विधान अन् फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येणार’ च्या चर्चांना बळ

  • Written By: Published:
गडकरींचं विधान अन् फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येणार’ च्या चर्चांना बळ

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं 4 वर्ष झाले परंतु महाराष्ट्रातील लोकांसह नेते फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद विसरलेले नाहीत. आज देखील नेते फडणवीसांना चुकून मुख्यमंत्री म्हणतात. असाच प्रकार आज नागपुरात पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. नंतर लगेच चूक दुरुस्त करत उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. ते नागपूरमध्ये डिजिटल ग्रंथालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

गडकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
आता पुन्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार की काय? मग एकनाथ शींदेंचं काय होणार? नेमका आता भाजप कोणता डाव खेळणार आणि फडणवीसांना मुख्यमंत्री करणार असा आशयाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘शिंदेंनी मला गृहमंत्री केले, मीच गृहमंत्री राहणार’; फडणवीसांनी ठणकावले ! 

गडकरी म्हणाले…

माझ्या प्रभागात डिजिटल ग्रंथालय बांधल्याबद्दल मी नगरसेवकाचे आभार मानतो. हे ग्रंथालय देशातील उत्तम गंथालय ठरणार आहे. परंतु इथे पुस्तक न वाचणारे लोक जास्त आहेत ते येथे टाईमपास करायला येतील याची काळजी घ्यावी. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून मुख्यमंत्री नाही – नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला 1500 कोटींचा निधी दिला आहे. असे यावेळी गडकरी यांनी सांगितले.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले नागपूर शहराचा विकास हा अजून जास्त गतीने होणार आहे. नागपूर हे देशातील पाहिलं शहर ठरणार आहे जिथे 24 तास पाणी भेटणार आहे. तसेच माझं एक स्वप्न आहे की अंबाझरी तलावातून बोटीने गोसीपर्यंत जात येईल. हे कठीण आहे परंतु हे देखील लवकरच पूर्ण होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube