Download App

पवारांकडून निवृत्ती जयंत पाटील, झिरवळ यांना अश्रू अनावर; अजितदादांकडून समजूत

NCP Leader Sharad Pawar Resign :  शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा आज केली. यानंतर सभागृहातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत तुम्ही हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तुम्ही हा निर्णय मागे घ्या, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सभागृहामध्ये शरद पवारांच्या नावाच्या घोषणांचा अक्षरक्षः पाऊस पडला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार असे कार्यकर्ते म्हणत आहे. यानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावरदेखील झाले आहेत. धनंजय मुंडे हे देखील शरद पवारांच्या पाया पडले आहेत. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांना आवरता दिसून येत आहे. याशिवाय जयंत पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आदींसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते यावेळी पवारांच्या बाजूला स्टेजवर उपस्थित आहेत.

पवारांच्या  निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणांनी यशवंतराव चव्हाण सेंटर परिसर दुमदुमून गेला आहे. यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना अश्रू अनावर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भावूक झालेले पहायला मिळाले आहेत. यानंतर सर्व कार्यकर्ते  शरद पवारांची समजूत घालण्यासाठी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.

पवार साहेब यांनी आम्हाला कोणाला विश्वासात घेतल नाही. हात जोडतो कृपा करुन निर्णय मागे घ्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. त्यांच्या नावाने मतं मागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने ओळखला जातो. ते बाजुला जाणे हा हक्क त्याना नाही, असे ते म्हणाले आहेत.

पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags

follow us