प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी )
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडे गेल्या दोन दिवसापासून देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांचा राजीनाम्याचे काय होणार? कोण होणार नवीन अध्यक्ष याविषयी चर्चा सुरु आहे. या सर्वांविषयी अज निर्णय स्मोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आज समितीसमोर ठेवण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रफुप्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर पक्ष, नेते आणि कार्यकर्ते यांची भूमिका समितीसमोर मांडली. समितीने एकमुखाने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला. कमिटीने राजीनामा नामंजूर केल्यानंतर ही बैठक संपली आहे.
Sharad Pawar Resigns : कार्याध्यक्षपदाबाबत जयंत पाटलांकडून नवी अपडेट…
आज पुन्हा पक्षाचे वरीष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी गेले आणि शरद पवार यांना समितीचा निर्णय कळवला आहे. आता शरद पवार यांच्याकडे समितीने निर्णय दिला आहे. शरद पवार यावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागाल आहे.
समितीने पवार यांचा राजीनामा नामंजूर करुन पुन्हा त्यांच्याकडे पाठवला . पण शरद पवार हे पुन्हा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवतात का? शरद पवार पक्षात कार्याध्यक्ष पद निर्माण करुन ते युवा नेत्याकडे जबाबदारी देतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पवार नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कोण होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष ? ; पाहा, कुणाच्या नावाला मिळाली सर्वाधिक पसंती
शरद पवार यांनी पुन्हा हेच पद स्वीकारालं तर त्यांनी राजीनामा का दिला? पक्षात बंडाळी होती का? एका गटाला भाजप सोबत जायच होता का? राष्ट्रवादीत गट संघर्ष टोकाला गेला होता का? शरद पवार यांना जनतेचं लक्ष स्वतःवर केंद्रित करायचं होत का? हे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व बाबी पाहता पवार आता काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर ते आणखी वेळ मागून घेतात का हे पाहणे देखील महत्वाचे आहे.