‘अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन’; सुळेंचे केसरकरांना चोख प्रत्युत्तर

Supriya Sule On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन […]

Letsupp Image   2023 06 16T130346.340

Letsupp Image 2023 06 16T130346.340

Supriya Sule On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचे त्या म्हणाल्या.

सुळे म्हणाल्या की, अमिताभ बच्चन सगळ्यांनाच राजकारणात हवा असतो. अमिताभ बच्चन यांचा आवाज, फोटो आणि ऑटोग्राफ सगळंच चालत अगदी तसंच अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे अमिताभ बच्चन आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Radhakrishna Vikhe : ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी, त्यामागे जिल्हा विभाजनाचा विचार नाही’

दीपक केसरकर काय म्हणाले

अजितदादांविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे. दादा हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी संजय राऊतांप्रमाणे बोलू नये. सामाजिक सलोखा राखण्यासाठी अजितदादा आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत सरकारमध्ये यावं. ते सक्षम व्यक्ती आहे. ते आले तर आम्हाला आनंद होईल. अजितदादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं ते सगळ्यांनी पाहिलं आहे, असे केसरकर म्हणाले.

इंदुरीकर महाराजांचे पुढचे किर्तन तुरुंगात? औरंगाबाद उच्च न्यायालयाचा मोठा दणका

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्यकार अध्यक्ष केले आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या दिवशी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारही व्यासपीठावर होते. यानंतर अजितदादा नाराज झाल्याचे बोलले जात होते. यानंतर अजितदादांनी मी कुठेही नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते.

Exit mobile version