Radhakrishna Vikhe : ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी, त्यामागे जिल्हा विभाजनाचा विचार नाही’

Radhakrishna Vikhe : ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी, त्यामागे जिल्हा विभाजनाचा विचार नाही’

Radhakrishna Vikhe Patil : अहमनगर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या सोयीसाठी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची (Upper Collector Offices) स्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मांडलेल्या प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, शिर्डीत हे कार्यालय होणं म्हणजे जिल्ह्याचे विभाजन आणि शिर्डीला नवीन जिल्ह्याचे मुख्यालय करण्याची योजना असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, याता खुद्द विखे पाटील यांनीच यावर भाष्य केलं आहे. (Radhakrishna Vikhe Patil said The Upper Collectorate is not part of the district division)

शिर्डीतील हे कार्यालय केवळ नागरिकांच्या सोयीसाठी असून त्यामागे जिल्हा विभाजनाचा कोणताही विचार नसल्याचे विखे पाटील यांनी सांगितलं.
विखे पाटील यांनी आज अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जिल्हा विभागाचा आणि शिर्डीतील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा काहीही संबंध नाही. जिल्हा निर्मितीचा हा निर्णय नाही. उत्तर नगर जिल्ह्यातील पाच-सात तालुक्यांमध्ये विविध शासकीय कामकाजाच्या सोयीसाठी हे कार्यालय शिर्डीत सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सासवडकरांनी केली गर्दी… 

शिर्डीत अपर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय होणं हा जिल्हा विभाजनाचा भाग असून याविरोधात शनिवारी श्रीरामपूर येथून बंदची हाक देण्यात आली आहे. यावरही विखेंनी भाष्य केलं. श्रीरामपूरमध्ये या कार्यालयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मला राजकारण दिसत आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार विखेंनी घेतला. विखे पाटील म्हणाले की, सात-आठ वर्षे महसूलमंत्रीपद भूषविणाऱ्यांनी या सुविधेसाठी पावले उचलली नाहीत, मात्र सध्या जे या निर्णयाला विरोध करत आहेत, त्यांनी कधीच आधी जे ‘त्यांच्या’ विरोधात भूमिका घेतली नाही.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादाविषयी विखेंना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे त्यावर पडदा पडला आहे. या दोन्ही नेत्यांचा आणि पक्षांचा त्या या जाहिरातीशी संबंध नाही . त्यात अतिउत्साही लोकांचा वाटा दिसतो. पण आमचे दोन्ही नेते त्यातून मार्ग काढण्यात सक्षम आहेत, असं सांगत विखेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube