Anil Deshmukh Criticized BJP over Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता सरकारच्या स्पष्टीकरणामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. परंतु आता या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सरकारच्या या कारभारावर कडाडून टीका केली आहे. भाजपाच्या नेत्यांना आता शेतकऱ्यांनी कांदे फेकून मारले पाहिजे आणि निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे अशी जळजळीत टीका देशमुख यांनी केला.
देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याचा मोठा डांगोरा पिटला, शेतकऱ्यांचं हित वगैरे बऱ्याच बाष्कळ गप्पा मारल्या. पण, आज केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणामुळे असंख्य शेतकरी बांधवांचे संसार अक्षरशः उद्धवस्त झालेत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे रिपोर्ट सांगतोय. या भाजपाच्या नेत्यांना शेतकऱ्यांनी कांदे फेकून मारले पाहिजेत व निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, अशी टीका देशमुख या व्हिडिओतून करताना दिसत आहेत.
Maratha Reservation : मराठ्यांचं आरक्षण कसं कमी झालं? फडणवीसांनी ‘स्टार्ट टू एन्ड’ सांगितलं
दरम्यान, येत्या दोन महिन्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशांतील कांद्याच्या किंमती नियंत्रित राहण्यासाठी 31 मार्चनंतरही ही बंदी उठविण्याचे शक्यता कमी आहे. यंदा रब्बी हंगामात कांद्याची लागवड कमी झालेली आहे. त्यामुळे उत्पादकाही घटनाची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातबंदी उठविण्याची शक्यता कमीच आहे. निर्यातबंदी न उठविल्यास महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयशी बोलताना कांदा निर्यातबंदी हटविण्यात आली नसल्याचे मंगळवारी सांगितले. निर्यातबंदी 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. कारण देशात कांद्याचा साठा ठेवायचा आहे. त्यामुळे किंमती नियंत्रणात ठेवण्यात मदत होणार आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
Maratha Reservation : शिंदे सरकारचं आरक्षण मंजूर नाही; जरांगेंनी इशारा देत पुन्हा उपसलं हत्यार