Download App

संभाजी भिडे हा भिडे नाहीतर ‘किडे’; जितेंद्र आव्हाडांची जळजळीत टीका!

मागील काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांच्या वादग्रस्त विधानावरुन राज्यात चांगलंच वादंग पेटलं आहे. भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा थेट विधानसभेच्या अधिवेशनातही चांगलाच गाजल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर भिडेंवर अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनीही भिडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. आव्हाड यांनी भिडेंचा ‘किडे’ असा उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. पुण्यात राष्ट्रवादीचे सोशल मीडिया शिबीर आयोजित करण्यात आले. त्यासाठी आव्हाड पुण्यात आले होते.

राजस्थानात 120 जागा संकटात; काँग्रेसच्याच सर्व्हेने केला धक्कादायक खुलासा

संभाजी भिडेला महाराष्ट्रातून विरोध करणार मी पहिला माणूस असून तो भिडे नाहीतर किडे आहे, असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडेंवर जळजळीत टीका केली आहे. तसेच संभाजी भिडेवर कारवाई होणार नसून हरियाणामध्ये जशी बिट्टू बजरंगीने दंगल पेटवली, तशीच दंगल पेटवण्याचं कंत्राट संभाजी भिडेला दिल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला आहे. तसेच काहीही करुन राज्यात हिंदु-मुसलमान दंगली पेटवं असं संभाजी भिडेला सांगण्यात आलं आहे. संभाजी भिडेला विरोध करणारा महाराष्ट्रातील पहिला माणूस कोण? तो मीच आहे, असंही आव्हाड यांनी छातीवर हात मारत सांगितलं आहे.

Happy Bhag Jayegi: आनंद एल राय यांच्या रोम-कॉम ‘हॅपी भाग जायगी’ ची 7 वर्ष !

संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, साईबाब, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. अमरावतीमधील आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. भिडेंच्या या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. भिडे यांच्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. त्यानंतर अमरावतीनंतर शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीनेही भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानानंतर अमरावती पोलिस ठाण्याकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आल्याचं समोर आलं होतं. या नोटीसीमध्ये व्हिडिओ क्लिपमध्ये असणारा आवाज हा संभाजी भिडेंचाच आहे का? याबाबत चौकशी करण्यात येणार होती. मात्र, संभाजी भिडेंवर अद्याप पोलिसांनी पुढील कारवाई केली की नाही? याबाबत अद्याप अस्पष्टता असून विरोधकांकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Tags

follow us