Download App

‘मुख्यमंत्रीसाहेब उगीचच राजकीय पतंग करु नका’; थोरल्या पवारांच्या टीकेवर रोहित पवार आक्रमक

Mla Rohit Pawar Vs Cm Eknath Shinde : कांदा खरेदीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर(Sharad Pawar) खोचक टीका केल्याचं दिसून आलं. शरद पवार(Sharad Pawar) 10 वर्ष कृषिमंत्री पण त्यांच्या काळात असा निर्णय झाला नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. शिंदेंच्या टीकेवर बोट ठेवत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळजळीत टीका केली आहे.

Letsupp Special : शरद पवारांचा ‘अशोक बापूंवर’ विश्वास; अजितदादांना होमपीचवर रोखण्याची जबाबदारी

आमदार रोहित पवार म्हणाले, एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही आधी शरद पवारांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले? याची माहिती अजित पवारांकडून घ्यायला हवी होती. तुम्ही माहिती घेतली असती तर हे वक्तव्य केलंच नसतं, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

‘शेतकरी थांबायला तयार पण, केंद्र सरकारने.. कांदाप्रश्नी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला

तसेच “आदरणीय पवारसाहेबांनी असा निर्णय घेतला नाही, हे आपलं म्हणणं नक्कीच खरं आहे. कारण पवार साहेबांनी आजच्या भाजपा सरकार प्रमाणे निर्यातशुल्क आकारून कांद्याचे भाव पाडले नाहीत. प्रसंगी साहेब तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांशी भांडले आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळं शिंदे साहेब आपण उगाचंच राजकीय पतंगबाजी न केलेचीच बरी” असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

शेतकऱ्याला गांजा अन् अफू लावायची परवानगी द्या; मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर खोतांचा संताप

केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतला?
कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु असताना केंद्र सरकारकडून मंगळवारी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. त्यानुसार केंद्र सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून महाराष्ट्रात कांदा खरेदी केली जाणार आहे. निर्यातशुल्काच्या अटीमुळे राज्यातील बाजारपेठेत कांद्याचे भाव खाली पडण्याची भीती होती. मात्र, आता केंद्र सरकारकडून २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदीची हमी मिळणे हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र, सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर याठिकाणी कांदा खरेदी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.

पवार साहेब श्रद्धास्थानीच…! वक्तव्याचा विपर्यास केला; माध्यमांवर घसरत वळसे पाटलांची दिलगिरी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आयात शुल्कात वाढ केल्याप्रकरणी शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यावरुन आता सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. सध्याचा कांदा हा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणीही होत आहे. तेव्हा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.

शरद पवारांच्या या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या कृषिमंत्रीपदावरुन शेलक्या टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर रोहित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांच्या टीकेवर मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार? याकडं अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us