पवार साहेब श्रद्धास्थानीच…! वक्तव्याचा विपर्यास केला; माध्यमांवर घसरत वळसे पाटलांची दिलगिरी
पुणे : माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला, असं म्हणतं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याच्या दावा केला आहे. (Cooperation Minister Dilip Valse Patil apologized to Sharad Pawar)
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत मी केवळ कालच बोलून दाखवली असे नाही.
कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही.
माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत… pic.twitter.com/jHveKLl7Us
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) August 21, 2023
यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे. माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला.
‘शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री..,’; दिलीप वळसे पाटलांची पहिल्यांदाच टीका
काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील?
एका कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी यांनी पहिल्यांदाच शरद पवारांवर थेट टीका केली. आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या, असं ते म्हणाले होते.