Download App

विधानभवनाच्या पायर्‍यांवर राडा, विरोधकांचं कांद्याच्या माळा घालून आंदोलन…

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session)आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु करण्यात आलंय. कांदा (Onion Price)आणि कापूस दरांवरुन (Cotton Price)विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात येतंय.

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडलाय.

ठाकरेंचा ‘मनीष सिसोदिया’ करू : आशिष शेलार यांनी धमकावले

आमदारांनी गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले आहेत. पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी सुरु केलीय.

राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्यानं अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Tags

follow us