बीडमध्ये होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अडमाप खर्चावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘शासन आपल्या दारी अन् खर्च सर्वसामान्यांच्या माथ्यावरी’ या शब्दांत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या खर्चावरुन आता जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला.
जीवघेणा निपाह व्हायरस होतो तरी कसा? व्हायरस किती धोकादायक? जाणून घ्या लक्षणं…
जयंत पाटील म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमात फक्त मंडपाचा खर्चच 2. 2 कोटी रुपये इतका असल्याचं टेंडर पाहण्यात आलं, राज्य सरकारने लोकांच्या पैशांची उधळपट्टीच लावली असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच राज्य सरकार स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम करत असून लोकांमध्ये भीती घालून सक्तीने लोकं जमवून शासकीय यंत्रणा, अधिकारी वर्गाला कामाला जुंपत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या मंचावरुनच विरोधकांवर टीका करायची अन् स्वतःचा उदोउदो करायचा हा नवीन उद्योग राज्य सरकारने सुरू केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
बीडच्या कार्यक्रमात 2 कोटींचा मंडप :
परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. साईड मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागवण्यात आली असल्याचा हिशोबच जयंत पाटील यांनी दिला आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेलं? रोहित पवारांनी बेधडक सांगितलं
दरम्यान, एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही अन् दुसरीकडे पैशांची अशी उधळण सुरू आहे. अशातच “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं” अशाने प्रश्न सुटत नसतात, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
Mrunal Divekar: मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला नग्न केलं अन्…”
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम हाती घेण्यात आला. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यंत्री विरोधकांवर टीकेची तोफ डागताहेत, त्यावरुनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा खर्च सांगत राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
दादांच्या सभेच्या खर्चाचा भार करदात्यांवर :
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात 17 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतही भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. आता शासन आपल्या दारी उपक्रमासाठी देखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे, मात्र यंदा खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.