ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेलं? रोहित पवारांनी बेधडक सांगितलं

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरोधात कोर्टात कोण गेलं? रोहित पवारांनी बेधडक सांगितलं

Rohit Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेतेही आंदोलनाची भाषा करू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर सडकून टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षण किंवा ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देत असताना भाजपकडून (BJP) मोठी भाषणं दिली जातात. मात्र, त्यानंतर संबंधित समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी भाजपाचेच पदाधिकारी न्यायालयात जातात, असा आरोप आ. पवार यांनी केला. पवार यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ऋषी सुनक यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले, हाऊ इज UT? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर 

ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळी उपस्थित झाला तेव्हा भाजपाचे काही पदाधिकारी हे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा भाजपचेच पदाधिकारी ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणत कोर्टात गेले होते. भाजप ज्या पद्धतीने काम करत आहे ते आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता आपला रोष व्यक्त करील आणि भाजप सरकार सत्तेतून जाईल असे आम्हाला वाटते, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

हक्क देण्याची वेळ येते तेव्हा कोर्टावर ढकलून द्यायचे

आता तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचीच सत्ता आहे. ट्रिपल इंजिन, चौथ्या इंजिनची भाषा नेते करतात. पण, ज्यावेळी हक्क देण्याची वेळ येते तेव्हा सरळ कोर्टावर ढकलून मोकळे होतात. भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. अशाच पद्धतीने भाजप काम करतो, अशी टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली.

यशोमती ठाकूर यांना राणा दाम्पत्याने खिंडीत गाठले, आता रवी राणांचाही मोठा दावा 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube