ऋषी सुनक यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले, हाऊ इज UT? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर

ऋषी सुनक यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले, हाऊ इज UT? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर

Eknath Shinde on Uddhav Thackeray : दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत जगभरातील देशांचे प्रमुख आले होते. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही दिलेली होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऋषी सुनक यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिंदेंनी उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंना टोला लावताना म्हटले होते की ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो तर काढला पण त्यांच्याशी काय बोलले ते तुम्हला कळलं का? की नुसतं चमकोगिरी करण्यासाठी फोटो काढला? अशा शब्दात शिंदेंची खिल्ली उडवली होती. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय.

यशोमती ठाकूर यांना राणा दाम्पत्याने खिंडीत गाठले, आता रवी राणांचाही मोठा दावा

जळगावच्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मी यावर बोलणार नव्हतो पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो, ऋषी सुनक यांनी मला विचारलं की हाऊ इज UT? आता युटी म्हणजे काय? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला. यावर काहींनी उत्तर देताना उद्धव ठाकरे असं म्हटलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी गौप्यस्फोट केला. ऋषी सुनक यांना मी म्हटलं, WHY? त्यावर सुनक म्हणाले, ते दरवर्षी लंडनला येतात, मोठमोठ्या प्रॉपर्टीज बनवतात. थंडगार हवा खातात, त्यांचं सगळं माझ्याकडे आहे, एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो, असं उत्तर एकनाथ शिंदेंनी ऋषी सुनक यांचा दाखला देत दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube