Download App

दादा किती दिवस तुम्ही गप्प राहणार आज बोलूनच टाका; धनंजय मुंडेंची चौफेर फटकेबाजी

NCP Rebellion Seperate Meetings : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली.

मुंडे म्हणाले की,  आपण अनेक वर्ष साहेबांची सेवा केली. साहेब विठ्ठल आणि आपण वारकऱ्यासारखं राहिलो. मी या प्रसंगातून याआधी गेलोय. त्यामुळे आता काय वाटत असेल हे मी समजू शकतो. शेवटी साहेबांना देखील स्वाभिमानासाठी निर्णय घ्यावा लागला होता. साहेबांचे सर्व सहकारी आमच्याोबत आहे. काही 2-4 जण तिकडे असून भुजबळ साहेबांनी त्यांना योग्य असा बडवे हा शब्द वापरला आहे.

कॉंग्रेस म्हणू… कॉंग्रेसच आणू… राष्ट्रवादीतील बंडादरम्यान कॉंग्रेसच्या पोस्टरची चर्चा

मुंडे पुढाले म्हणाले की, “आज माझं मन रडत असून माझ्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत. किती वेदना अजितदादांनी साहेबांसोबत असताना सहन केल्या असतील. आपल्या मनाला विचारुन सांगा, व्यासपीठावरील एक तरी व्यक्ती साहेबांचा थुका तरी ओलांडू शकतो का. आयुष्यभर राजकारण करताना दादांनी कधी साहेबांचा शब्द ओलांडला नाही. ज्या व्यक्तीने सर्वात जास्त अपमान भोगला असेल, सगळ्यात जास्त मान खाली जावी लागली असेल, सगळ्यात जास्ता ठेचा खाव्या लागल्या असतील तर त्याचे नाव म्हणजे अजितदादा पवार होय”.

तसेच माझ्यासारख्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला, पक्षातून हाकलेलेल्या माणसाला इथे बोलायची संधी फक्त अजितदादांमुळे मिळाली आहे. एवढ्या प्रसंगानंतर ही वेळ येते आहे, तर ती का येते याचा उलगडा झाला पाहिजे. अजितदादा तुम्ही तुमचं मन मोकळं करावं. किती दिवस तुम्ही तुमच्या मनात असंख्य प्रसंग, असंख्य अपमान दाबून ठेवणार आहात. तुम्ही तुमच्या सावलीला देखील तुमचा अपमान सांगितला नाही. एकदा हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे, असे  मुंडे म्हणाले.

‘साहेब, बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशिर्वाद द्यायला या’; भुजबळांची आर्त साद!

काही झालं की दादांवर टीका, दादांवर आरोप करायचे. 2017 सालचं सांगितलं,  2019 चं पहाटेचं उदाहरण दिलं. प्रत्येक गोष्टीत दादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला नियतीवर विश्वास आहे. अजितदादा नियत तुमची साफ आहे. नियती तुमच्या पाठीमागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत मुंडेंनी अजितदादांसाठी जोरदार बॅटींग केली.

Tags

follow us