Download App

आशीर्वाद नाही तर, दिल्ली भेटीचे निमंत्रण; PM मोदींचा निरोप घेऊन अजितदादा गेले होते पवारांच्या भेटीला

Sharad Pawar and Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे काल दिल्ली येथे एनडीएच्या बैठकीसाठी उपस्थित होते. तर शरद पवार हे बंगळुरु येथे विरोधकांच्या बैठकीसाठी गेले होते. पण यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर येते आहे. शरद पवार यांना अनौपचारिकरित्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांनी आपल्या साथीदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गट व अजित पवार गट यांच्याकडून एकमेकांवर कडाडून टीका करण्यात आली. पण 16 जुलै रोजी अचानक अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांसह यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Shinde VS Thackery : राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? ठाकरे-शिंदेंची धाकधूक वाढली; दोन्ही गटांकडून नोटीसला उत्तर

तसेच यानंतर दुसऱ्यादिवशी देखील अजित पवार यांनी विधानसभा व विधानपरिषदेतल्या आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली. पण आता यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना अनौपचारिकरित्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याचे कळते आहे. तसेच त्यांना एनडीएच्या बैठकीला आणण्याची जबाबदारी अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निरोप घेऊन शरद पवारांना भेटले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

पण शरद पवारांनी एनडीएच्या बैठकीला यायला नकार दिला. तसेच शरद पवारांना एनडीएच्या बैठकीला आणण्याचा भाजपचा प्लॅन होता. शरद पवार जर एनडीएच्या बैठकीला आले असते तर विरोधी आघाडी तुटल्याचा संदेश दिला जाणार होता, अशी माहिती आहे. दरम्यान, काल दिल्लीतील अशोका हॉटेल येथे झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी. नड्डा यांच्याशी जवळपास अर्धा तास बैठक झाल्याचे कळते आहे. यानंतर त्यांचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Tags

follow us