Shinde VS Thackery : राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? ठाकरे-शिंदेंची धाकधूक वाढली; दोन्ही गटांकडून नोटीसला उत्तर
Notice to Shinde-Thackery MLA : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिवसेना (UBT) गटाच्या 55 आमदारांची धाकधूक वाढलेली आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 14 आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन्ही गटांना 7 दिवसांता कालावधी देण्यात आला होता. हे उत्तर देताना दोन्ही गटांना अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. त्यात मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही गटांनी या नोटीसला उत्तर दिले आहे. (Shinde Shivsena Thackery UBT Answered to Assembly speaker Rahul Narvekar’s Notice )
Ravindra Mahajani यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…
ठाकरे गटाने काय उत्तर दिलं?
या नोटीसला तब्बल 262 पानाचं उत्तर देताना ठाकरे गटाने म्हटलं की, आम्ही 14 आमदारचं खरी शिवसेना आहोत. आम्ही राजकीय पक्ष असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेची आटना आणि व्हिपची कॉपी ठाकरे गटाने पाठवली आहे. तसेच 2018 च्या एडीएम बैठकीत उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्ष प्रमुख होते. असं उत्तर ठाकरे गटाने दिलं आहे.
पुढे ठाकरे गटाने असं देखील म्हटलं की, एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलेलं आहे. पक्षाची घटना मोडून त्यांनी अनधिकृतपणे पक्षावर दावा केली आहे. 2018 च्या नियमांनुसार सुनील प्रभुंचा व्हिप लागू होत होता. तर सर्वोच्च न्यायालायाने देखील व्हिप हा राजकीय पक्षाचाचा लागू होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
शिंदे गटाने काय उत्तर दिलं?
तर दुसरीकडे शिंदे गटाने या नोटीसला उत्तर देताना 16 आमदारांनी वेगळं उत्तर तर उर्वरित 24 आमदारांनी एकत्र उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी व्हिपबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, आमचाचा व्हिप निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत. तसेच निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्ह देखील आम्हालाच दिलं आहे. यात त्यांनी शपथपक्ष जोडत आपलं हे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे.
या नोटीसला उत्तरं देताना दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.