Ravindra Mahajani यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…

Gashmeer Mahajani Post: मराठी सिनेसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ अशी ओळख मिरवणार्या रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. रविंद्र महाजनी यांचं सारं कुटुंब मुंबईमध्ये आणि केवळ रविंद्र महाजनी पुण्यात वेगळे का राहत होते? या सवालापासून ते बाप-लेकामध्ये मतभेद होते का?

Gashmeer Mahajani Post
इथंपर्यंत अनेक गोष्टींची या दरम्यान चांगलीच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. रविंद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. घरातून दुर्गंध आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी कळते, यावरून अनेकांनी त्यांचा लेक आणि अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) चांगलेच ट्रोल केले आहे.
यावर आता पहिल्यांदा गश्मीरने प्रतिक्रिया देत इंस्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी पोस्ट केली आहे. गश्मीरने इंस्टा पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करत असताना लिहले आहे की, ‘ स्टार ला स्टार राहू द्या. आम्ही शांत राहणंचं पसंत करू. त्यामुळे आमच्याबद्दल द्वेष निर्माण होत असेल तर तेही मला मान्य आहे. मृताच्या आत्म्याला शांती प्रदान होवो. तुमच्यापेक्षा जास्त ते आम्हांला माहित होते ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. भविष्यात योग्य वेळ आली की याबद्दल कदाचित मी नक्कीच व्यक्त होईन.’
अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांकडून रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर व्यक्त केल्या जाणार्या भावनांबद्दल संताप व्यक्त केला आहे. शनिवार १५ जून दिवशी पुण्यामधील तळेगाव दाभाडे येथील भाड्याने राहत असलेल्या एका फ्लॅटमध्ये रविंद्र महाजनी मृतावस्थेमध्ये आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी दार तोडून त्यांचं शवविच्छेदन पाठविण्यात आले होते. पुण्यातच रविंद्र महाजनी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
तेव्हा गश्मीर त्याचे कुटुंबीय पुण्यात आले होते. पोस्ट मार्टमच्या अहवालानुसार रविंद्र महाजनी यांचा मृत्यू गुरूवारी झाला असावा. हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर जखमा, खूणा नसल्याचं सांगण्यात आलं आहे. रविंद्र महाजनी हे ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मी’,’गोंधळात गोंधळ’ यासह मराठी, हिंदी, गुजराती सिनेमात झळकले होते.