BJP Vs NCP : नवनीत राणांनी अट फेटाळली अन् राष्ट्रवादीकडून भाजप नेत्यांच्या ‘पॅकिंगची चर्चा रंगली

NPC Politics नुकतीच नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी हवी असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती...

NCP

NCP

NPC Politics To Counter BJP Operation Lotus : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीने एक नवे वळण घेतले आहे. नुकतीच नवनीत राणा यांना राज्यसभेची उमेदवारी हवी असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, त्यांनी ही अट फेटाळून लावल्याने हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याआधी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेते संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर त्यांना थेट उमेदवारी देण्यात आली होती. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीच्या नावाखाली भाजप नेत्यांचे ‘पॅकिंग’ करत आहे का? आणि त्यांच्या या ‘बॅडरूम पॉलिटिक्स’मागचे नेमके गणित काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

लेट्सअप विशेष : पटेल पुन्हा ‘किंगमेकर’! जैन यांना उमेदवारी देऊन ‘साईडलाईन’ च्या चर्चांना पूर्णविराम…

राष्ट्रवादीची ‘मास्टरस्ट्रोक’ रणनीती काय?

राजकीय तज्ज्ञांच्या मते, राष्ट्रवादीची ही रणनीती केवळ पक्षविस्तार नसून ती एका मोठ्या राजकीय गणिताचा भाग आहे. भाजप किंवा इतर पक्षांतील प्रभाव असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात आणून किंवा त्यांना आपल्या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडून, राष्ट्रवादी संबंधित क्षेत्रातील प्रतिस्पर्धी पक्षाची ताकद मुळापासून कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या गोटात गोंधळ आणि असंतोष निर्माण होतो, जो राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडतो.

संजय काकडेंचा प्रवेश ‘सोयीचे राजकारण’

संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देताना राष्ट्रवादीने अत्यंत सावध पवित्रा घेतला होता. हा केवळ एक पक्षप्रवेश नसून, पुणे आणि आसपासच्या पट्ट्यातील भाजपच्या वर्चस्वाला लगाम लावण्याचा हा एक कल्पक प्रयत्न होता. जेव्हा एखादा भाजपच्या बड्या नेत्याचा वारसदार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवतो, तेव्हा भाजपला आपलीच भूमिका किंवा उमेदवार अडचणीत आणणे कठीण जाते. ही रणनीती राष्ट्रवादीसाठी ‘मास्टरस्ट्रोक’ ठरली आहे.

विक्रम काकडेंच्या विजयाने पवारांनी 14 वर्षांपूर्वीच्या ऋणाचं संजय काकडेंना दिलं राजकीय ‘रिटर्न गिफ्ट’

नवनीत राणांनी अट का नाकारली?

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने घातलेली ‘प्रवेशाची अट’ नवनीत राणा यांनी नाकारण्यामागे स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख जपण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. यात भाजपशी असलेल्या त्यांच्या घनिष्ट संबंधांमुळे राष्ट्रवादीत प्रवेश करणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ‘आत्मघाती’ ठरू शकले असते. त्याशिवाय ज्या विचारधारेच्या विरोधात त्यांनी आजवर राजकारण केले, त्या पक्षात जाणे त्यांना आपल्या मतदारांना पटवून देणे कठीण गेले असते.

‘हायजॅक’चे राजकारण: ‘ऑपरेशन कमळ’ला प्रत्युत्तर

संजय काकडे, विक्रम काकडे आणि आता नवनीत राणा यांच्या प्रकरणातून राष्ट्रवादीची ही ‘चलाख खेळी’ समोर येते. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी केवळ स्वतःचे उमेदवार पुरेसे नसून, प्रतिस्पर्धी पक्षाच्या बड्या नेत्यांना ‘हायजॅक’ करणे हे अधिक प्रभावी असल्याचे राष्ट्रवादीच्या धुरिणांना कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपची ‘ऑपरेशन कमळ’ ही रणनीती मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादीने आता भाजपमधीलच नेत्यांना आपल्या अटींवर मैदानात उतरवून ‘शह-काटशहा’ देण्याचे नवीन अस्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे. ही खेळी आगामी काळात महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे कशी बदलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version