Download App

Maharashtra Politics : NCP हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष? फडणवीसांचा दावा खरा आणि खोटाही…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तीन जिल्ह्यांचा पक्ष या शब्दांत प्रहार केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फौजदाराचा हवालदार होण्याची वेळ राष्ट्रवादीने आणल्याचं म्हणत खरपूस समाचार घेतला. पण दोन्ही नेत्यांच्या वाकयुद्धात देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

पाकिस्तानचे पंतप्रधानपद म्हणजे `कत्तल` : विजनवास, अटक, फाशी या पैकी काहीतरी होणारच!

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लोकसभेत चार खासदार आहेत. हे खासदार म्हणजे बारामतीच्या सुप्रिया सुळे, शिरूरचे अमोल कोल्हे, साताऱ्याचे श्रीनिवास पाटील आणि रायगडचे सुनील तटकरे. त्यातील सुळे आणि कोल्हे यांचे मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यात येतात.

श्रीनिवास पाटील यांचा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यात आहे. रायगड हा मतदारसंघ रायगड आणि रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलेला आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला टोमणा मारला असावा, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतेयं.

Parineeti Raghav जोडीने निघाले दिल्लीला, ‘या’ दिवशी ठरला साखरपुड्याचा मुहूर्त?

राष्ट्रवादीचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनेक जिल्ह्यातून हे आमदार प्रतिनिधित्व करतात. मात्र, काही जिल्ह्यांत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रत्येक जिल्ह्यात संघटन असलेला राष्ट्रवादी महाराष्ट्रव्यापी पक्ष आहे हे निश्चित आहे.

राष्ट्रवादीची ताकद पश्चिम महाराष्ट्रात केंद्रित झाली आहे. त्यातही पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे पक्षाचे बालेकिल्ले आहेत. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव येथेही पक्षाची स्थिती चांगली आहे.

अपघाताच्या आठवणीने नितीन गडकरी भावूक; म्हणाले, म्हणून मी वाचलो

कोकणातील रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांतूनही आमदार निवडून आलेले आहेत. मराठवाडा, मुंबई आणि विदर्भ येथे पक्षाची ताकद तुलनेने कमी आहे. अर्थात 2014 पर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यांत पक्षाने चांगला जम बसविला होता. पण पद्मसिंह पाटील यांच्यासारखे नेते भाजपमध्ये गेल्याने काही जिल्ह्यांत नेतृत्व नाही.

Karnataka Election: प्रचाराच्या तोफा थंडविल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आले अडचणीत

बीडसारख्या जिल्ह्यात पवार यांना मानणारा मतदार सुरूवातीपासून होता. तो आजही कायम आहे. गणेश नाईक हा नवी मुंबईतील मोहरा भाजपमध्ये गेल्याने तेथेही पक्षाची ताकद रोडावली आहे. पवार यांची ताकद किती, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. ते त्यांच्या नेतृत्वाखाली ५० ते ५५ आमदार निवडून आणू शकतात, असं बोललं जातं. पण २००४ मध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजे ७२ आमदार निवडून आणले होते.

२०१४ मध्ये पक्षात मोठी पडझड झाली. त्यामुळे ताकद कमी झाली हे निश्चित. पण पक्षाकडे शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व असल्याने खासदार जरी साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असले तरी ताकद ही राज्यातील समीकरणे घडविणारी किंवा बिघडविणारी आहे. म्हणूनच फडणविसांचा टोला हा भाषणापुरता मर्यादित असला तरी आपला सामना राष्ट्रवादीशी आहे, याची जाणीव त्यांना आहे.

Tags

follow us