NCP Sharad Pawar Partys Ex MLA Prajakt Tanpure on Rahuri By election : अहिल्यानगर जिल्ह्यात शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता यावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आपण ही निवडणूक लढवणार की, नाही यावर भूमिका स्पष्ट केली
नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे?
मी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या बद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे. त्याचं कार्य कुणीही डावलू शकत नाही. त्यांच कार्य हे डोंगरा एवढं अत्यंत उत्तुंग असं आहे. तसेच सध्या जरी मी भाजपच्या विरोधी बाकावर बसत असलो. तरी देखील मी एका बाबतीमध्ये मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करेल की, त्यांनी जो मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईतील उर्जा खात्यातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल.
बाजार ‘रॉकेट’ होईल या भ्रमात राहू नका! पुढचे ६ महिने अत्यंत कठीण; इन्व्हेसटर्सने आता काय करावं?
तसेच पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, मी आमदार होईल किंवा इतरही राजकीय पद मिळेल. ते केवळ माझ्या एकट्यासाठी नसेल. आमची संघटना आहे तीन तीन पिढ्यांपासून कार्यकर्ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत. एक कुठे तरी भवानिक संबंध आहे. गेल्या पाच वर्षांत नवीन कार्यकर्ते देखील आमच्याशी जोडले गेले आहेत. या सर्वांच्या मताचा आदर ठेवला गेला पाहिजे. मी एकटा जे म्हणेल त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा व विचारविनिमय करणार आहे. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील अंतिम निर्णय घेणार आहे. असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
Grok AI चा दावा, नेतन्याहू यांचा व्हिडिओ डीपफेक, नव्या दाव्याने चर्चांना उधाण
राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
