Download App

‘महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला’…; जयंत पाटील थेट बोलले

  • Written By: Last Updated:

NCP Leader Jayant Patil :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर भाष्य केले आहे. तसेच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस देखील पाठवली आहे. यावर देखील ते बोलले आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर देखील भाष्य केले आहे.

महाराष्ट्रात जे दंगलीचे वातावरण होते आहे ते जाणीवपूर्वक केले जात आहे का. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गृह विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये जातीयवादी दंगली घडवण्याची कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा तातडीने पोलिसांनी छडा लावला पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Google सर्च केलं : पत्नी, मुलीची हत्या करत बड्या अधिकाऱ्याची आत्महत्या

महाविकास आघाडचीच्या जागावापाबाबत अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आमची बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांकडून दोन-दोन प्रतिनिधी मिळून आमची बैठक होणार आहे. यामध्ये प्रत्येक जागेचा मिरीटनुसार आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले आहेत. जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही स्ट्रॅटेजी ठरलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी शक्य त्या ठिकाणी एकत्र रहावे असे ठरलेले आहे.

असंवैधानिक विधानांना काडीमात्र किंमत देत नाही, राऊतांच्या टीकेला नार्वेकरांचं प्रत्युत्तर

काही ठिकाणची परिस्थिती वेगळी असेल. मुंबईमध्ये शिवसेना व काँग्रेस यांचे बळ समान असेल तर त्या ठिकाणी काय करायचे याचा विचार आम्ही करु, असे पाटील म्हणाले आहे. एमआयएमबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. आमच्यात अद्याप त्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही असे पाटील म्हणाले आहेत.

Tags

follow us