Download App

शिंदेंचं बंड ते राष्ट्रवादीतील फूट मतदारांनी व्यक्त केली नाराजी; कौल कोणाला देणार? सर्व्हे काय सांगतो?

NCP Voter survey : राज्यातील राजकारणात विविध घडामोडींनी मोठी उलथापालथ करून ठेवली आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंडाचं हत्यार उपसल आणि अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. दरम्यान त्या घडीमोडींना एक वर्ष पूर्ण होत नाही तोच यावर्षी पुन्हा राज्यात मोठा भूकंप झाला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केलं आणि ते थेट भाजपच्या सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र यावर राज्यातील जनतेची ससेहोलपट काही विचारात घेतली गेली नाही. त्यामुळे सध्याच्या राजकारणावर जनता आगामी निवडणुकांमध्ये काय कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर एका सर्व्हेतून जनतेची सध्याच्या राजकारणावरील नाराजी समोर आली आहे. ( NCP Voter survey on Maharashtra Political crises Shivsena NCP Congress Bjp )

काय आहे हा सर्व्हे?

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनतेला म्हणजे मतदारांना काय वाटत? याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते त्याला लोकांनी दिलेल्या रेटिंगवरून असे समोर आले आहे की, सध्याच्या राजकारणावर राज्यातील मतदार नाराज आहेत. या सर्व्हेक्षणामध्ये सर्वपक्षीय मतदरांचा समावेश करण्यात आला आहे. हा सर्व्हे सकाळ या वृत्त समुहाने केला आहे. यामध्ये नेत्यांनी राज्यात बंड करून राजकीय पेच निर्माण करण्यावर लोकांन काही प्रश्न विचारण्यत आले त्याला लोकांनी रेटींगच्या स्वरूपात उत्तरं दिली आहेत.

काय आहेत प्रश्न आणि रेटींग?
प्रश्न – मुळ पक्षात वेगळा गट करून सत्तेत सहभागी होण्याता नवीन पायंडा मतदार म्हणून आपल्याला मान्य आहे का?
रेटींग – होय – 19.1 टक्के, नाही- 80.9 टक्के.

प्रश्न – निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांर आपलं काय मत आहे?
रेटींग – आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी- 38.7 टक्के
नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे – 13.3 टक्के
कायमस्वरूपी निवडणूक लढविण्यावर बंदी आणावी – 30 टक्के
यापैकी नाही- 18 टक्के

प्रश्न – फुटीर आमदारांबद्दल राष्ट्रवादीच्या मतदारांना काय वाटत?
रेटींग – निर्णय मान्य- 14 टक्के
कायमची बंदी घालावी- 29 टक्के
राजीनामा द्यावा- 41 टक्के
यापैकी नाही- 15 टक्के
सांगता येत नाही- 1 टक्के

प्रश्न – फुटीर आमदारांना राष्ट्रवादीचे मतदार पुन्हा निवडून देणार का?
रेटींग – होय -36 टक्के, नाही- 41 टक्के, सांगता येत नाही- 23 टक्के

प्रश्न – फुटीर आमदारांबद्दल शिवसेनेच्या मतदारांना काय वाटत?
रेटींग – निर्णय मान्य- 12 टक्के
कायमची बंदी घालावी- 33 टक्के
राजीनामा द्यावा- 39 टक्के
यापैकी नाही- 16 टक्के

प्रश्न – फुटीर आमदारांना शिवसेनेचे मतदार पुन्हा निवडून देणार का?
रेटींग – होय -31 टक्के, नाही- 45 टक्के, सांगता येत नाही- 24 टक्के

Tags

follow us