Download App

संजय राऊतांचं डोकं फिरल्यासारखं असं वाटतंय; अजित पवारांचं नाव घेताच तटकरे का भडकले?

या गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल आणि जो कोणी या घटनेत गुन्हेगार आहे, त्याच्यावर कठोर शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्टीकरणही तटकरे

  • Written By: Last Updated:

Sunil Tatkare on Sanjay Raut : बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनीही बीड प्रकरणावरुन अजित पवारांना लक्ष्य करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Sanjay Raut) तसंच, बीड प्रकरणात मुख्य आरोपीला सोडून इतर कोणालाही सोडणार नाही, अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याचं त्यांनी म्हटलं. आता, संजय राऊत यांच्या टिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पलटवार केला आहे.

त्यांचं डोकं फिरलय

मस्साजोग प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार की धनंजय मुंडे यांना वाचवत आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यासंदर्भात सुनील तटकरेंना प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांचं डोकं फिरल आहे असं वाटतंय. अजित पवारांना वाचवण्याचा प्रश्न कुठं येतोय, असा संतप्त सवाल केला. तसंच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या स्वरुपात यंत्रणांमार्फत तपास सुरू ठेवला आहे.

संभाजीनगरमध्ये नाही, आता शिर्डीत होणार राष्ट्रवादीचे नवसंकल्प शिबीर,हे आहे कारण

या गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल आणि जो कोणी या घटनेत गुन्हेगार आहे, त्याच्यावर कठोर शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्टीकरणही तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिले. त्यामुळे, राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पालकमंत्रीपदाच्या बाबतीत जो काही निर्णय आहे, तो मुख्यमंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री घेतील असं म्हणत रायगडचे पालकमंत्रीपद कोणाकडं येईल या प्रश्नावर तटकरेंनी उत्तर दिलं.

धनंजय देशमुख एसआयटी प्रमुखांना भेटणार

SIT चे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेण्यासाठी धनंजय देशमुख आणि काही ग्रामस्थ हे दुपारी तीन वाजता मस्साजोगमधून निघतील. केजच्या शासकीय विश्रामगृह येथे बसवराज तेली यांची भेट धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांकडून घेतली जाईल. यावेळी, तपासाची सध्याची स्थिती काय यासंदर्भात माहिती घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

follow us