Download App

महिलेवरील सामूहिक हल्ल्यावरुन नीलम गोऱ्हे भडकल्या

पुणे : समाज माध्यमांवर (Social Media)पोस्ट केल्याचा राग मनात धरून एका महिला कार्यकर्त्यावर (Women activist)महिलांनी सामूहिक हल्ला केल्याची घटना कल्याण (Kalyan)येथे घडली आहे. ही घटना निंदनीय आहेच. ती महिला कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)यांच्या पक्षाचे काम करते. तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज आपण तिला फोन केला. या घटनेची पोलिसांनी काय दखल घेतली? याची आपण आज ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग (Thane Police Commissioner Jayjit Singh)यांच्याकडे विचारणा केली आहे. याबाबत त्यांनी गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर याबाबत योग्य कार्यवाही करीत असल्याचेही विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे(Aditya Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) त्या महिला कार्यकर्त्याची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. परंतु अशा घटना राजकारणात (Politics)घडू नयेत.

महिलांना सुरक्षितपणे राजकारणात काम करता आले पाहिजे. हे फार आवश्यक आहे, असं मला वाटतं. एका बाजूला महिला कार्यकर्त्यांबाबत अर्वाच्च उद्गार काढून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय.

महिलांनी जाऊन महिलेवरती प्राणघातक हल्ला करणे, यामुळे सर्व राजकारण गढूळ होत आहे. त्या दृष्टीने अशा घटना थांबवण्यासाठी सर्वांनी याबाबत कामाची नियमावली, आचारसंहिता बनवली पाहिजे. महिलांना मतभेद असले, तरी सुरक्षित काम करता आले पाहिजे, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Tags

follow us