राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…

राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…

मुंबई : येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

पैसे कमवायचा ठेका काय फक्त इंदुरीकरांनी घेतलाय का?

जयंत पाटील म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी विभागीय स्तरावरील प्रमुखांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यभरात विभागीय स्तरावर शिबीरं पार पडणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…

तसेच पुढील दोन महिन्यातच राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात दौरे करणार असून ज्या विभागाचा जो प्रमुख आहे, तिथल्या प्रमुखाकडे जबाबदारी देऊन पक्षासाठी पुढील काम करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय.

राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 248 नवीन रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

पुढील काही दिवसांतच सात जिल्ह्यांच्या पक्षांतर्गत निवडणूका पार पडणार महाराष्ट्रात बूथ बांधणीच्या कार्यक्रमासाठी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलीय. तसेच विभागीय शिबिरांचीही सूचना यावेळी करण्यात आली आहे.

दरम्यान, आजची बैठक ही पूर्वनियोजित असून पक्षसंघटनेसाठी ही बैठक पार पडली असून छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर आता पुढची महाविकास आघाडीची सभा नागपूरात होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube