उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…

छ.संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात आली. काल छत्रपती संभाजीनगरच्या मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.
Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…
मात्र, आज भाजपकडून मराठा सांस्कृतिक मैदानात गौमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण करण्यात आलंय. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 248 नवीन रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू
यावेळी बोलताना भाजपचे अध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मैदानावर अनेक सभा घेतल्या होत्या. या सभांमधून बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला गाडण्याचे आव्हान दिले होते. मात्र, कालच्या सभेत उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन सभा घ्यावी लागली असून ही मोठी शोकांतिका असल्याचं ते म्हणाले आहेत.
साताऱ्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू! जिल्हा प्रशासनाकडून मास्क वापरण्याचे आदेश…
तसेच बाळासाहेब ठाकरेंनी पारंपारिक विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडून टाकण्याचं म्हंटलं, हिंदुत्वाचा हुंकार दिला होता, तेच मैदान कालच्या उद्धव ठाकरेंच्या सभेने अपवित्र झाल्याने मैदानाचं शुद्धीकरण करत असल्याचंही त्यांनी म्हटलयं.
छत्रपती संभाजीनगरच्या सभांमध्ये अनेकदा बाळासाहेब म्हंटले होते की, शिवसेनेचे काँग्रेस व्हायला लागेल तेव्हा माझं दुकान बंद करणार, असा स्वाभिमानी बाणा बाळासाहेबांनी दाखवला होता. आज तोच स्वाभिमान उद्धव ठाकरेंनी गहाण ठेवला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
.