Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…

Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…

मुंबई : अरे हरामखोरांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अर्जात काय लिहिलंय ते बघा, सावरकरांनी लिहिलेला माफीचा अर्ज स्वत:साठी नाहीतर इतर कैद्यांसाठी लिहिला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस आज मुंबईतील स्वांतत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानच्या जेलमध्ये कसा प्रवास होता, याबाबत स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांवर निशाणा साधत ‘हरामखोर’ असा उल्लेख केला आहे.

Photos: नादियाचा ओव्हर मेक-अप पाहून शाहिद आफ्रिदी झाला नाराज, पण साधेपणा पाहून बूम-बूम झाला फिदा

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, तब्बल 11 वर्ष स्वांतत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत अनन्वित अत्याचार सहन केले. जर सावरकर माफीवीर असते तर त्यांनी आत्महत्या केली असती, किंवा सावरकर शरण गेले असते, असंही ते म्हणाले आहेत. सावरकरांना अंदमानमधील बारी नावाच्या जेलर अन्याय अत्याचार केले. तरीही कुठलाही जेलर अन्याय त्यांच्या मनातून स्वातंत्र्यलक्ष्मीला बाहेर काढू शकलेला नाही. सावरकरांचे बंधूदेखील अंदमानच्या जेलमध्ये होते. एकाच जेलमध्ये असतानाही वर्षानुवर्षे ते एकमेकांना दिसत नव्हते, जेव्हा ते एकमेकांसमोर आले तेव्हाही त्यांच्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणखी काय करता येईल अशाच चर्चा सुरु होत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Gaja Marne विरोधात २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा : पण… पोलिसांना पुरावा सापडला नाही!

जेलरने सावरकरांवर अन्याय अत्याचार केले त्याविरोधात सावरकरांनी सत्याग्रह आणि बंड पुकारला होता. सावरकरांनी सत्याग्रह केल्याने त्यांचा सात ते आठ दिवस जेवण दिलं नव्हतं. तरीही त्यांनी चिंता केली नाही. जेलर त्यांच्यावर धर्मांतरासाठी अन्याय अत्याचार करीत होता. मात्र, सावरकरांनी जेलरलाही जेरीस आणलं, असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. याबाबत कदाचित राहुल गांधी यांना माहित नसेल, असंही त्यांनी म्हंटलंय.

पुणेकर ऑनलाईन सेवा घेण्यात नंबर वन; महाराष्ट्र सर्वाधिक सेवा देणारं राज्य

अंदमानच्या काळ्या पाण्याच्या जेलमध्ये असताना सावरकरांनी लिहिलेल्या पत्राबद्दल त्यांनी स्पष्ट केलंय. फडणवीस म्हणाले सावरकरांनी कैद्यांच्यावतीने इंग्रजांना अर्ज केला होता. अर्जात सावरकर म्हणाले, “मला माहीत आहे की तुम्ही मला सोडणार नाहीत. पण तुम्ही इथल्या सर्व राजकीय बंदींना सोडून द्या” असं पत्र इतर कैद्यांसाठी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलं होतं.

‘धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करा’, तृप्ती देसाईंची मागणी

सावरकरांनी जो अर्ज केला तो स्वत:साठी नाहीतर इतर कैद्यांसाठी केला होता. सावरकरांच्या पत्रानंतर किंग जॉर्ज जेलमध्ये आले आणि त्यांनी सर्व कैद्यांना सोडून दिलं पण सावरकरांना सोडलं नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. त्यावेळी महात्मा गांधींनी सावरकारांना सांगितलं की, तुम्ही पत्र लिहुन मला सोडण्याची मागणी करा, कारण मी एक राजकीय बंदी आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर माफी मागायला मी सावरकर नाही, असं विधान केलं होतं. गांधी यांच्या या विधानानंतर राज्यभरातून सावरकरप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आज सावरकर यात्रेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांच्या पत्राबद्दल सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube