वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!
Prakash Ambedkar Calls Maharashtra Bandh on July 23, वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
Prakash Ambedkar Calls Maharashtra Bandh on July 23 Over Delhi Student Lathi-Charge: दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे संपुर्ण देशातील जनता संतप्त झाली आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही या घटनेचा निषेध केला. या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठींबा मिळत आहे. शिवाय राजकीय पक्षाचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
दिल्लीत शांततापुर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (23 जुलै) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मी सर्व समविचारी पक्षांना, विद्यार्थ्यांना आणि समाजातील सर्वच स्तरातील लोकांना आवाहन करतो की, एकत्र येऊन 23 जुलैला महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
तसेच दिल्लीला जंतर मंतर येथे जाऊन अनेक नेत्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे अशा अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तर आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तसेच या आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या नीट (NEET) परीक्षार्थींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई मिळावी आणि संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.