इराण-अमेरिका संघर्षाने तेलाचा भडका; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता

इराणने अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांविरुद्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 08T100742.706

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचा (Iran) थेट परिणाम आता जागतिक तेल बाजारावर दिसू लागला आहे. दोन्ही देशांकडून पुन्हा हल्ले सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरांनी झपाट्याने उसळी घेतली आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात 1.5 टक्क्यांनी वाढ होऊन तो प्रति बॅरल 97.88 डॉलर्सवर पोहोचला आहे. 23 जुलैनंतर तेलाच्या किमतीत झालेली ही मोठी वाढ मानली जात असून संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.

भारतासाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. देश सध्या इंडियन बास्केटसाठी सरासरी 99.38 डॉलर्स प्रति बॅरल दराने कच्चे तेल खरेदी करत आहे. गेल्या शुक्रवारी हा दर 101 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचला होता. जूनमध्ये 83 डॉलर्स, जुलैमध्ये 82 डॉलर्स आणि ऑगस्टमध्ये 90 डॉलर्स असलेली सरासरी किंमत आता आणखी वाढल्याने तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे.

देशवासियांना पॉर्न दाखवून युद्ध लढणार! रशियाविरोधात युद्धखर्चासाठी युक्रेनची नवी खेळी, जगात चर्चा

इराणने अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांविरुद्ध बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला. त्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणच्या 3 तेल टँकर्सवर हल्ला केल्याची माहिती समोर आली असून या घडामोडींनंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीचा भडका उडाला. पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे पुढील काही दिवस तेल बाजारात मोठे चढउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांचा फटका भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना बसू शकतो. भारतीय तेल कंपन्या सध्या इंधनाचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाची तेजी कायम राहिल्यास दरवाढीचा दबाव वाढू शकतो. यापूर्वीही इराण-अमेरिका संघर्षाच्या काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 4 वेळा वाढ करण्यात आली होती.

follow us