राहुल गांधी पुन्हा पुण्यात येणार; आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देणार?
Rahul Gandhi Pune Visit राहुल गांधी पुन्हा पुण्यात येण्याची शक्यता; मांजरी येथे उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता
Rahul Gandhi Pune Visit, Meet Tribal Students at Protest Site : पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाची राजकीय पातळीवर दखल घेतली जात आहे. गेल्या 13 दिवसांपासून पुण्यातील मांजरी परिसरात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. एवढेच नाही, तर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी राहुल गांधी मांजरी येथे जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर ; 51 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच
राहुल गांधी यांच्या पुणे दौरा अद्याप नक्की नसला तरी मंगळवारी संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे भुरिया यांनी सांगितले. त्यामुळे 13 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा मिळाल्याचे चित्र आहे.
या आंदोलनाची माहिती राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्यामागे पुण्यातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रम महत्त्वाचा ठरला. 22 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी थेट राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या. विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला.
रुपाली चाकणकरांवर दिपाली सय्यदने ठोकला 500 कोटींचा दावा? नेमका वाद काय?
त्यानुसार 24 ऑगस्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ग्रामीण आणि दुर्गम भागातून पुण्यासारख्या शहरांमध्ये येतात. त्यांच्यासाठी सरकारी वसतिगृह ही केवळ निवासाची सुविधा नसून शिक्षण सुरू ठेवण्यासाठीची महत्त्वाची आधारव्यवस्था असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले.
वसतिगृहाच्या प्रवेशासाठी असलेल्या वयोमर्यादेचाही या पत्रात मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. सध्या 30 वर्षांची मर्यादा असल्याने उच्च शिक्षण घेणारे, शिक्षण पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागणारे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अडचणीत येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या नियमाचा फेरविचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर विमानतळ खासगीकरणाच्या तयारीत; रायपूरसोबत क्लस्टर
फक्त प्रवेशाचा प्रश्नच नाही, तर वसतिगृहातील दैनंदिन सुविधांबाबतही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. भोजनाचा दर्जा, स्वच्छतेची व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. असे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. प्रश्न केवळ आश्वासनांपुरता न ठेवता त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रातून अधोरेखित केले आहे.
राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार?, भाजपच्या संसदीय मंडळात फडणवीसांना संधी?, दिल्लीतील चर्चांना वेग
दरम्यान, आंदोलनाचा कालावधी वाढत असताना राहुल गांधी स्वतः उपोषणस्थळी येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मांजरीतील या आंदोलनाकडे आता राजकीय तसेच प्रशासकीय स्तरावर अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाल्यास विद्यार्थ्यांशी त्यांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा होते आणि सरकारकडून त्यानंतर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.