‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पैसे वाटपाचा आरोप, चौकशी होणार; CM फडणवीसांच्या सूचना

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी पैसे वाटपाचा आरोप

Devendra Fadnavis On Rahul Gandhi

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी पैसे वाटपाचा आरोप सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात चौकशी होणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एखादा चित्रपट हिट करण्यसाठी त्यापूर्वी जशी कॉन्ट्रोव्हर्सी तयार केली जाते,त्याचप्रमाणे राहुल गांंधींच्या ‘छात्रों की गुंज’ साठी कॉन्ट्रोव्हर्सी घडवून आणली गेली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनीही बारकाईने लक्ष ठेवून तपास करावा असा सूचना केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने तरुणाईला ड्रग्जपासून दूर ठेवण्यासाठई कॅम्पस कनेक्ट अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, राहुल गाधींचा (Rahul Gandhi) कार्यक्रम हा पूर्णपणे इव्हेंट असून त्यासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये 90 टक्के मुली काँग्रेस (Congress) नेत्यांशी संबंधित महाविद्यायांतील आहे. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला (Chhatron Ki Goonj) प्रसिद्धी देण्यासाठी पैसे देऊन इन्फ्लुएन्सर्सना बोलावले जात आहे असा आरोप देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल त्यांना फक्त पॉझिटिव्ह टाकायला सांगितले जात आहे. सोशल मीडियावर पॉझिटिव्हच कंटेंट टाका तरच तुम्हाला पैसे देऊ, नेगिटिव्ह टाकला तर पैसे देणार नाही असं या इन्फ्लुएन्सर्सना सांगितलं गेले आहे असा दावा देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या – राहुल गांधी

देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या होत आहे. 100 पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो. आज शिक्षणातही महिलांसोबत भेदभाव सुरु आहे. महिलांच्या पदवीपेक्षा पुरुषांची पदवी श्रेष्ठ मानली जातेय आर्थिक हिंसाचारालाही महिलांना तोंड द्यावं लागतं असं पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले.

आश्रमशाळांमध्ये बेड, पिण्याचं पाणी नाही, आदिवासी मंत्री म्हणतात सॉरी; राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं सांगितल्या अडचणी

पुण्यातील गोंधळ हा काँग्रेसने ठरवून केलेला प्रकार आहे. या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील.

पुणे में हुआ हंगामा कांग्रेस द्वारा सुनियोजित तरीके से किया गया प्रकार है। इस मामले में पुलिस उचित कार्रवाई करेगी।

(नवी मुंबई | 22-8-2026)#Maharashtra #NaviMumbai pic.twitter.com/RMBFcGCgEM

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2026

follow us

संबंधित बातम्या