आश्रमशाळांमध्ये बेड, पिण्याचं पाणी नाही, आदिवासी मंत्री म्हणतात सॉरी; राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं सांगितल्या अडचणी

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आयोजित 'छात्रों की गुंज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद

Rahul Gandhi

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आयोजित ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. या कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायाला मिळाली. ‘छात्रों की गुंज’ (Chhatron Ki Goonj) कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासमोर विद्यार्थिनींनी मन मोकळे करत आपल्या अडचणी मांडल्या. त्यापैकी एक निशा नावाच्या विद्यार्थिनीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या राहुल यांच्यासमोर मांडल्या. निशाने आदिवासी विद्यार्थ्यांचं मांजरीत उपोषण सुरु असल्याची माहिती राहुल गांधी यांना देत आपल्या मागण्यांचं निवेदन दिले.

माझी गोष्ट ही फक्त एका निशाची (Tribal Student) नाही तर सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची आणि महाराष्ट्राची आहे. आम्ही उपोषणासाठी बसलोय, आमचे भाऊ आणि दोन बहीण देखील बसल्या आहेत, त्यापैकी एका बहिणीची तब्येत नाजूक झालीय तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आमचे प्रतिनिधी मंत्रालयात गेले तेव्हा आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री सॉरी मी याच्यावर काही करु शकत नाही हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्याचे त्यांनी सांगितलं. तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बसला असाल आणि तुम्ही जर आमचा विकास करु शकत नाही तर तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही असं राहुल गांधीशी (Rahul Gandhi) बोलताना निशा म्हणाली.

पुढे बोलताना निशा म्हणाली की, आदिवासी शाळांमध्ये सेंट्रल किचन सुरु केलं आहे. एका ठिकाणी जेवण बनतं आणि 70 ते 80 किमी लांब घेऊन जात असल्याने जेवण खराब होत आहे. त्यामुळे विषबाधा होते. आदिवासी आश्रमशाळांमध्ये बेडची देखील सुविधा नाही. पिण्याचं पाणी नाही त्यामुळे गडचिरोलीत मण्यार सापानं दंश केल्यानं तिघांचा मृत्यू झाला तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सरकारनं विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान एक कोटींची मदत करावी असं देखील निशा म्हणाली.

तर आदिवासी वसतिगृह आहेत ती पुण्यातील (Pune) मध्यवर्ती भागात नाही ती मांजरी आणि कोंढवा भागत असल्याने प्रवासात चार तासांचा वेळ जातो त्यामुळे शिकायला वेळ मिळत नाही. आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन मागील दहा दिवसांपासून उपोषणासाठी बसलोय. यानंतर राहुल गांधींना निशाने आंदोलन स्थळी येण्याचे आमंत्रण दिले. आंदोलन स्थळी मला बोलवा, मी येईन असं राहुल गांधी म्हणाले.

देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या; ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या – राहुल गांधी

देशात दरवर्षी 4.50 लाख स्त्रीभ्रूण हत्या होत आहे. 100 पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो. आज शिक्षणातही महिलांसोबत भेदभाव सुरु आहे. महिलांच्या पदवीपेक्षा पुरुषांची पदवी श्रेष्ठ मानली जातेय आर्थिक हिंसाचारालाही महिलांना तोंड द्यावं लागतं असं या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले.

follow us