‘कोई नयी मूवी बनाओ’ म्हणत CJI सूर्यकांतांचा राजपाल यादवला सल्ला; कोर्टात हशा पिकला, पण एका वकिलाची पोस्ट चर्चेत

CJI Surya Kant’s advice to Rajpal Yadav;राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात CJI सूर्यकांतांच्या सल्ल्यानंतर वकिल नरेंद्र गोस्वामींची पोस्ट चर्चेत.

CJI Surya Kant’s advice to Rajpal Yadav sparked laughter in court

CJI Surya Kant’s advice to Rajpal Yadav sparked laughter in court: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणावर बुधवारी (7 ऑक्टोबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राजपाल यादव यांना हलक्याफुलक्या शैलीत, “एखादा चांगला चित्रपट बनवून लोकांचं पुन्हा मनोरंजन करा. तुमची प्रतिमा पुन्हा चांगली होईल,” असा सल्ला दिला. या खंडपीठात न्यायमूर्ती जोयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांचाही समावेश होता.

…पण मी दादांसारखी नाही! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना थेट इशारा

राजपाल यादव सुनावणीसाठी स्वतः न्यायालयात उपस्थित होता. यावेळी त्याने आपल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं न्यायालयाला सांगितलं. “मी 200 ते 250 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गेल्या 13 वर्षांत माझं 200 ते 250 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ‘अता पता लापता’मुळे माझे 17 कोटी रुपये वाया गेले,” असं त्याने सांगितलं.

त्यावर मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी, “एखादा चांगला चित्रपट बनवून लोकांचं पुन्हा मनोरंजन करा. तुमची प्रतिमा पुन्हा चांगली होईल. आमच्याकडे काही वकीलही चांगले कलाकार आहेत. त्यांना घेऊन एखादा चित्रपट बनवा,” अशी मिश्किल टिप्पणी केली. या टिप्पणीमुळे काही काळ न्यायालयात हशा पिकला.

12 तासांत चार पत्रकार परिषदा अन् दोन मंत्र्यांचे गंभीर आरोप; राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने लावली ताकद

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाची सुरुवात 2010 मध्ये झाली. ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी राजपाल यादवने मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर 2013 मध्ये या रकमेच्या परतफेडीसाठी देण्यात आलेले सात चेक बाऊन्स झाल्याचं प्रकरण समोर आलं.

या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.

2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

बुधवारच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव यांनी 1.15 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट न्यायालयात सादर केला. उर्वरित 85 लाख रुपये त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या संभाव्य खरेदीदाराकडून 12 ऑक्टोबरपर्यंत जमा केले जातील, अशी माहिती देण्यात आली.

यानंतर सुप्रीम कोर्टाने 13 ऑक्टोबरपर्यंत एकूण 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

‘वकील नरेंद्र गोस्वामींची पोस्ट’

दरम्यान, या सुनावणीतील हलक्याफुलक्या टिप्पणीवर सुप्रीम कोर्टाचे वकील नरेंद्र गोस्वामी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

 

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राजपाल यादव यांना कथितपणे, “कोई नयी मूवी बनाओ” असं म्हटलं आणि न्यायालयातील हा हलकाफुलका क्षण लगेचच चर्चेचा विषय ठरला.

मात्र, या प्रसंगामागे एक गंभीर मुद्दा आहे. न्यायालयीन प्रकरणात एखादा सेलिब्रिटी असला, तरी न्यायालयीन प्रक्रिया ही सेलिब्रिटींच्या चर्चेपुरती मर्यादित होता कामा नये. न्यायालयात वातावरण हलकंफुलकं होऊ शकतं, विनोदही होऊ शकतो. पण निकाल देताना कायदा, तर्क आणि योग्य न्यायप्रक्रियेलाच सर्वोच्च महत्त्व असतं.

घटनात्मक न्यायालयात एखाद्या व्यक्तीमुळे बातमीचा मथळा तयार होऊ शकतो. मात्र प्रकरणाचा निकाल व्यक्तिमत्त्वावर नाही, तर कायदा आणि न्यायाच्या तत्त्वांवरच ठरला पाहिजे.

follow us