रुपाली चाकणकरांवर दिपाली सय्यदने ठोकला 500 कोटींचा दावा? नेमका वाद काय?

Maharashtra Epstein File Movie Controversy रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर दिपाली सय्यद यांनी चाकणकरांवर 500 कोटींचा बदनामीचा दावा टाकला.

Maharashtra Epstein File Movie Controversy

Maharashtra Epstein File Movie Controversy : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अभिनेत्री दिपाली सय्यद या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चाकणकरांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या आरोपाखाली दिपाली सय्यदसह 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर विमानतळ खासगीकरणाच्या तयारीत; रायपूरसोबत क्लस्टर

रुपाली चाकणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर कथितरीत्या आपले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचा तसेच चित्रपटाच्या दोन टीझरमधून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या प्रकरणाला राजकीय रंग आला असून, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटातील काही व्यक्तिरेखा आणि प्रत्यक्ष राजकीय व्यक्तींमध्ये साम्य असल्याचेही बोलले जात आहे. त्यात दिपाली सय्यद या रुपाली चाकणकरांची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत दिपाली सय्यद यांच्याकडून अधिकृतपणे काय सांगण्यात आले आहे, याकडे लक्ष लागले आहे.

Donald Trump : ट्रम्प यांचे वजन 10 किलोंनी वाढले; जगातील सर्वात ‘वजनदार’ 5 नेते कोण?

रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण कोणाचीही बदनामी केलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच चाकणकरांनी बदनामी केल्याचा आरोप केला असेल, तर त्याचा पुरावा सादर करावा, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.

दिपाली सय्यद म्हणाल्या की, “मी सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांच्याबद्दल कोणतीही पोस्ट केलेली नाही. हा चित्रपट श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक दाखवणारा आहे. चित्रपटातील पात्र काल्पनिक असून हा कोणाचाही बायोपिक नाही. त्यामुळे या चित्रपटामुळे कोणाची बदनामी होण्याचा प्रश्नच नाही.”

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही दिपाली सय्यद यांनी ठाम भूमिका घेतली आहे. वाद आणि तक्रारीनंतरही ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार?, भाजपच्या संसदीय मंडळात फडणवीसांना संधी?, दिल्लीतील चर्चांना वेग

दरम्यान, या संपूर्ण वादामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असल्याचा आरोपही दिपाली सय्यद यांनी केला आहे. रूपाली चाकणकर यांनी बदनामीचा 25 कोटीचा दावा माझ्यावर टाकला. आता आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे आणि 500 कोटींचा दावा रूपाली चाकणकर यांच्यावर टाकला आहे, असेही दिपाली सय्यद म्हणाल्या.

त्यामुळे आता ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’च्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाभोवतीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकरांच्या तक्रारीवर पोलीस काय भूमिका घेतात आणि दिपाली सय्यद यांनी सांगितलेला 500 कोटींचा दावा प्रत्यक्षात कायदेशीर प्रक्रियेत जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us