वाटाण्यावरुन संजय राऊत संतापले; फडणवीसांनी तो ‘कच्चा वाटाणा’ घरी नेऊन शिजवून खावा!
Sanjay Raut targets Fadnavis निकृष्ट शालेय पोषण आहाराच्या दर्जावरून राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; न शिजलेल्या वाटाण्यावरुन राऊत संतापले.
Sanjay Raut targets Fadnavis over poor-quality school meals : शालेय पोषण आहाराच्या दर्जावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आंबेगावमधील एका शाळेत देण्यात येणारा वाटाणा कुकरच्या तब्बल 13 शिट्ट्या झाल्यानंतरही शिजला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांनी सरकारला धारेवर धरले. हा प्रकार समोर आणणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी ऊर्फ रेश्मा पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा दावा करत, अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हिंगोलीत कावड यात्रेत दोन डीजेंची भीषण धडक; रिव्हर्स घेत धडकवलेल्या वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू
’13 शिट्ट्यांनी जो वाटाणा शिजला नाही, तो फडणवीसांनी घरी शिजवावा’
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून सरकारला टोला लगावला. “कुकरच्या 13 शिट्ट्या वाजल्यानंतरही जो वाटाणा शिजला नाही, तो वाटाणा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या घरी शिजवावा,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
देशात आजही 20 ते 25 लाख टन साखर,15 दिवस द्या सगळी साखर बाहेर काढून दाखवतो
आंबेगावच्या शाळेतील हा प्रकार लोकांसमोर आणणाऱ्या देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, लोकांच्या दबावानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘निकृष्ट आहार पुरवणारा पुरवठादार फडणवीसांचा खास माणूस’
शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यावर गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी संबंधित पुरवठादाराच्या राजकीय संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला. हा पुरवठादार नागपूरचा असून त्याचे नाव पगारिया असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पगारिया हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा असून भाजपला निवडणुकांसाठी आर्थिक मदत करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.
‘वाटाणा वर्षा बंगल्यावर घेऊन जा’
संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सरकारवर आणखी आक्रमक शब्दांत टीका केली. “आंबेगावच्या शाळेतला हा न शिजणारा वाटाणा वर्षा बंगल्यावर घेऊन जावा आणि फडणवीसांना खायला द्यावा,” असे ते म्हणाले.
Tukaram Mundhe : महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश
निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या सेविकेवर कारवाई करण्यात आली, तसेच “देवयानी पारधी यांचे निलंबन करण्याऐवजी निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवणाऱ्या पगारियाचे निलंबन करावे,” अशी मागणी राऊतांनी केली.
‘जेनझींनी फडणवीसांना प्रश्न विचारावेत’
दरम्यान, नागपुरात भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचाही राऊतांनी उल्लेख केला. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या तरुणांनी शालेय पोषण आहाराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पैसे वाटपाचा आरोप, चौकशी होणार; CM फडणवीसांच्या सूचना
“जर ते जेनझी पेड नसतील तर त्यांनी फडणवीसांना या विषयावर प्रश्न विचारावेत,” असे राऊत म्हणाले. त्यामुळे या वक्तव्यावरूनही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
‘फडणवीसांनी शिक्षक आणि जेनझींच्या नादी लागू नये’
शालेय पोषण आहाराच्या मुद्द्यावरून शिक्षक आणि तरुण वर्ग आता जागरूक झाला असल्याचा दावा करत राऊतांनी सरकारला इशारा दिला. “देवेंद्र फडणवीसांनी आता जेनझींच्या आणि शिक्षकांच्या नादी लागू नये. ते जागरूक झाले आहेत,” असे राऊत म्हणाले.
तसेच सरकारला लक्ष्य करत “आता आम्ही तुम्हाला तो कच्चा वाटाणा खाऊ घालू आणि तो वाटाणा तुम्हाला खावाच लागेल,” अशा शब्दांत राऊतांनी ठणकावून सांगितलं.
या प्रकरणात अंगणवाडी सेविकेवरील कारवाई, पोषण आहाराचा दर्जा आणि संबंधित पुरवठादारावर करण्यात आलेले आरोप यामुळे शालेय पोषण आहाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांकडून आणि संबंधित पुरवठादाराकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.