‘भूतम भयम्’ची जोरदार हवा! चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून भरभरून कौतुक, आजपासून सर्वत्र प्रदर्शित
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे.
Strong air of ‘Bhootam Bhayam’ : चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात घर करणं, हे प्रत्येक चित्रपटाचं स्वप्न असतं. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूतम भयम्’ने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. ट्रेलर, गाणी आणि चित्रपटाची भन्नाट झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता अक्षरशः चाहत्यांच्या प्रेमात रूपांतरित झाली असून, चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
याच प्रेमाची खास दखल घेत ‘ऑरेंज ज्यूस गँग’ने चाहत्यांसाठी एक्सक्लुझिव्ह फॅन स्क्रीनिंगची घोषणा केली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठ्या पडद्यावर ‘भूतम भयम्’ अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचं समजताच चाहत्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर घोषणा होताच गुगल फॉर्मद्वारे हजारोंची नोंदणी झाली आणि हा क्षण चित्रपटाविषयी असलेल्या विश्वासाची आणि कमालीच्या उत्सुकतेची साक्ष देणारा ठरला.
फॅन स्क्रीनिंगसोबतच निवडक इन्फ्लुएन्सर्ससाठीही विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगनंतर सोशल मीडियावर चित्रपटाचे भरभरून कौतुक होत असून कलाकारांचा अभिनय, भव्य सेट्स, प्रभावी मेकअप, पार्श्वसंगीत आणि गाणी या सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहाणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून विशेषतः छाया कदम यांच्या रहस्यमय आणि भयावह लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे मैदानात; उद्या अहिल्यानगरात मौन आणि धरणे आंदोलन
प्रदर्शनापूर्वीच चाहते आणि इन्फ्लुएन्सर्सकडून मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता ‘भूतम भयम्’भोवती तयार झालेलं सकारात्मक वातावरण आता चित्रपटगृहांमध्येही पाहायला मिळणार, अशी चिन्हे आहेत. हॉरर आणि कॉमेडीचा भन्नाट संगम असलेला हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.
रामचंद्र अरुण गांवकर लिखित व दिग्दर्शित, नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटात करण सोनावणे, निनाद लिमये, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मनमीत पेम, प्रताप फड आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.