Ahilyanagar : मढी गडावर महिलेवर अत्याचाराचा आरोप; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

अहिल्यानगरच्या मढी देवस्थान गडाच्या स्वच्छतागृहात महिलेवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच संजय मरकड यांनी केलायं.

Madhi devsthan

Madhi Devsthan : अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. मढी गडावरील (Madhi Devsthan) स्वच्छतागृहात एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप माजी सरपंच संजय मरकड यांनी केला आहे. या घटनेनंतर देवस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसून आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मढी गावचे माजी सरपंच संजय मरकड यांनी मढी गडावरील देवस्थान परिसरातील स्वच्छतागृहात एका महिलेवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी तीव्र टीका केली आहे. मरकड यांच्या आरोपानूसार, देवस्थान परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असतानाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करत एका व्यक्तीचा नग्न अवस्थेतील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची चर्चा आहे.

शेअर मार्केट घोटाळा, आर्थिक तडजोड पोलीस निरीक्षकाला भोवली; गुन्हे शाखेतील राठोड निलंबित

दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे. तसेच या आरोपांबाबत देवस्थान विश्वस्त मंडळाची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

follow us