पुणेकर ऑनलाईन सेवा घेण्यात नंबर वन; महाराष्ट्र सर्वाधिक सेवा देणारं राज्य

पुणेकर ऑनलाईन सेवा घेण्यात नंबर वन; महाराष्ट्र सर्वाधिक सेवा देणारं राज्य

पुणे : राज्यातील (Maharashtra) नागरिकांना ऑनलाईन सेवा (Online service)देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आपले सरकार सेवा पोर्टल (Aple Sarkar Seva Portal)सुरु करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यात विशेष गोष्ट म्हणजे, महाराष्ट्र हे सर्वाधिक सेवा (Most services)उपलब्ध करुन देणारे पहिले राज्य ठरले आहे. त्यातल्या त्यात या सेवेचा सर्वाधिक उपयोग पुणेकरांनी घेतला आहे. मागील वर्षी सर्वाधिक 34 लाख पुणेकरांनी (Pune)या सेवेचा ऑनलाइन सेवेचा फायदा करुन घेतला आहे.

सरकारने आपले सरकार या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर 506 अधिसूचित सेवांपैकी 409 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. बाकी 97 सेवांसाठीची प्रणाली विकसित केली जात आहे. राज्यातील 32 हजार 543 आपले सरकार सेवा केंद्रांचा उपयोग यासाठी होत आहे.

विरोधकांची खैर नाही! एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नका, आता पंतप्रधान मोदींनी CBI ला स्पष्टच सांगितलं

31 मार्च 2021 पर्यंत 9 कोटी 78 लाख 81 हजार 812 अर्ज मिळाले होते. त्यावर 9 कोटी 40 लाख 65 हजार 732 अर्जांवर कार्यवाही झाली. आपले सरकारवर सेवा मिळवण्यासाठी त्याआधी स्वतःचे प्रोफाईल तयार करुन घ्यावे लागते. त्यात सर्व अधिकृत कागदपत्रांचा समावेश असतो. 31 मार्च 2021 पर्यंत 42 लाख 70 हजार 97 जणांनी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करुन प्रोफाईल तयार केले आहेत.

गत काही वर्षांमध्ये अनेक नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यात 2017-18 या वर्षामध्ये 12 लाख 18 हजार 336 लोकांनी नोंदणी केली आहे. तर 2018-19 या वर्षांमध्ये 19 लाख 50 हजार 823 लोकांची नोंदणी झाली आहे. तसेच 2019-20 मध्ये 28 लाख 29 हजार 795 लोकांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर 2020-21 या वर्षामध्ये 42 लाख 70 हजार 97 लोकांनी नोंदणी केली आहे.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण 31 विभागांपैकी 28 विभागांनी 506 सेवा अधिसूचित केल्या आहेत. त्यात गृह आणि परिवहन विभाग (90), उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभाग (80), महसूल व वनविभाग (66), नगर विकास (52) या चार विभागांनी जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन दिल्या आहेत.

आपले सरकार पोर्टलवर 2015 ते 2021 दरम्यान राज्यभरातून एकूण 9 कोटी 78 लाख 81 हजार 812 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 9 कोटी 40 लाख 65 हजार 732 अर्जांवर कार्यवाही झाली. राज्यात 2020-21 यावर्षी महसूल विभागनिहाय प्राप्त, मंजूर आणि कार्यवाही झालेल्या अर्जात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्याची आहे. पुण्यात सर्वाधिक 34 लाख 11 हजार 103 अर्ज आले आहेत. 31 लाख 93 हजार 796 अर्जांवर कार्यवाही झाली आहे. त्यातील 31 लाख 73 हजार 185 अर्ज मंजूर झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube