Gaja Marne विरोधात २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा : पण… पोलिसांना पुरावा सापडला नाही!

Gaja Marne विरोधात २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा : पण… पोलिसांना पुरावा सापडला नाही!

Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला खंडणी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. शेअर मार्केटमध्ये ४ कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्याबदल्यात २० कोटी रुपयांची एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याने सहा महिन्यांपूर्वी कुख्यात गुंड मारणे याच्यासह त्याच्या १४ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नसल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांत पोलिसांना या प्रकरणात कोणत्याच प्रकारचा पुरावा न सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून गजा मारणेला पोलीस वाचवत असल्याचे बोलले जात आहे.

गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी पुण्यातील एका व्यवसायिकाला २० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणात पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह साथीदारांना सहा महिन्यांपूर्वी अटक देखील केली होती. मात्र, पोलीस तपासात मारणे यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळून आलेला नाही.

पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात मारणे विरोधात पुरावे नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गजा मारणे याचा कारागृह बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करू, असे मारणे याचे वकील विजय ठोंबरे यांनी सांगितले आहे.

Trupti Desai यांची इंदुरीकर महाराजांवर टीका : पैसे कमवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच दिलाय का? – Letsupp

एका शेअर ट्रेडिंगमध्ये ४ कोटी रुपये गुंतविल्यानंतर त्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचं अपहरण केले होते. या प्रकरणात पुणे  गुन्हे शाखेने गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी त्यावेळी गजा मारणे याच्यासह १४ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून गजा मारणेसह इतर साथीदार जेलमध्ये आहेत.

मात्र, याच गजा मारणेला आता मोक्कातून वगळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोलले जात आहे. गजा मारणेवर पुणे पोलिसांची मेहनरजर असल्याचं समोर येत आहे. मात्र, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मारणे याला मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांनी १६९ चा अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या या भमिकेमुळे एकच चर्चा रंगली आहे.

(7) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube